Chalisgaon

मंगेश चव्हाण यांचा तालुक्याच्या विकासाचा ध्यास

मंगेश चव्हाण यांचा तालुक्याच्या विकासाचा ध्यास
झंझावाती प्रचार दौऱ्यात गाव पाड्यातील बांधवांशी साधला संवाद,
विजयाचा “जयघोष”

मनोज भोसले

चाळीसगाव तालुक्यातील गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जनसेवेचा वारसा लाभलेल्या मंगेश चव्हाण यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे. असा प्रत्यय यांच्या सुरू असलेल्या “झंझावाती” प्रचार दौऱ्यातून दिसून येत आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील व जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पवार वाडीतील विठ्ठल मंदिरात प्रचार दौरा चे नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाने तरुण व तडफदार उमेदवार मंगेश चव्हाण यांचे प्रत्येक गावातून तरुणांकडून यांचे स्वागत केले जात आहे.

गायरान बु. खु., दसेगाव, मेहुणबारे, तिरपोळे, वरखेडे बुद्रुक, दरेगाव (पिंपळवाडी) दरा तांडा, कृष्णापुरी, विसापूर, रामनगर, लोंढे, पळासरे, चिंचगव्हाण, दहिवद, खडकिसिम, धामणगाव, भवुर, शिद वाडी, जामदा, भवाळी आदी गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

विजयाचा “जयघोष” घुमला,
पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नामदार गिरीश भाऊ महाजन,खासदार उन्मेष दादा पाटील व मंगेश चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा कमळ फुलविण्यासाठी चा जयघोष गावागावात, घराघरात करण्यात आला.

मंगेश चव्हाण यांच्या पत्नी सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी शहरातील प्रभाग क्र.9 व 10 मध्ये जोरदार प्रचार करत शहरात प्रचाराची आघाडी घेतली.

त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, तालुकाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, जि प सभापती पोपट तात्या भोळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य धर्मराज वाघ, नगराध्यक्ष आशालताताई विश्वास चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा, महिला आयोग सदस्या देवयानी ताई ठाकरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस कैलासबापू सूर्यवंशी, जेष्ठ नेते राजेंद्र अण्णा चौधरी, पं स सभापती दिनेशभाऊ बोरसे, उपसभापती संजय तात्या पाटील, मार्केट सभापती रविंद्र पाटील, संचालक सरदारशेठ राजपूत, ऍड राजेंद्र सोनवणे,
अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन दादा पाटील, पं स सदस्य पियूष साळुंखे, गटनेते संजूआबा राजपूत, तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम, धनंजय मांडोळे, अनिल नागरे,
भाजपा प्रदेश सदस्य यु डी माळी सर,
जि प सदस्या मोहिनी अनिल गायकवाड,
पं स सदस्य कै.चिं.बापू पाटील,
पं स सदस्या सौ.सुनंदा सुरेश साळुंखे,
तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम,
तालुका उपाध्यक्ष राजेंद्र अमृतकार,
मार्केट कमिटी संचालक सरदारशेठ राजपूत,
गट प्रमुख भैय्यादादा वाघ,
गणप्रमुख सुनील पवार,
गणप्रमुख विनोद (भोला) पाटील,
तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, उपाध्यक्ष कपिल पाटील,
प्रज्ञावंत आघाडीचे रमेश सोनवणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, किशोर पाटील ढोमनेकर, दिनकर राठोड, व सर्व आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य सरपंच उपसरपंच सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button