बेटमोगरा येथे विश्ववंदनिय,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमीत्त अभिवादन.
नांदेड प्रतिनिधी /वैभव घाटे
दि.14: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील धम्मशिल बुद्धविहार मध्ये रमाई फाऊंडेशन चे सचिव भारत सोनकांबळे यांनी व ग्रामपंचायत सदस्या लालिताबाई सोनकांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भारत सोनकांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्या ला उजाळा देत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ग्रामसेवक श्री स्वामी के.एस. व सरपंच सौ पद्मजा खुशाल पाटील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे यावेळी दीपप्रज्वलन करून महामानवाला अभिवादन केले. यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री.खुशाल पाटील, तलाठी रवी कापसे,दत्तात्रय पाटील मुदळे, दिलीप सोनकांबळे,रामजी सोनकांबळे,यशवंत सोनकांबळे, राहुल सोनकांबळे,सुरेश नवलेकर, नागेश सोनकांबळे, शंकर सोनकांबळे,हर्षदीप सोनकांबळे, सुनील सोनकांबळे आदींनी देशातील कोरो ना व्हायरस मुळे सद्यस्थितीतील परिस्थिती पाहता सोशल
डीस्टन्स चा वापर करीत यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.






