Chalisgaon

ब्राम्हणशेवगे गावाची भुमिपुत्राच्या मदतीने पाणीदार गावाकडे वाटचाल : खोलीकरण झालेल्या नाल्यानी मार्च महिन्यापर्यंत धरला तग

ब्राम्हणशेवगे गावाची भुमिपुत्राच्या मदतीने पाणीदार गावाकडे वाटचाल : खोलीकरण झालेल्या नाल्यानी मार्च महिन्यापर्यंत धरला तगसोमनाथ माळीब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव। या गावाची ओळख दुष्काळग्रस्त गाव म्हणून च होती. परंतु मागील चार वर्षापासून या गावातील पाण्यासाठी चळवळ उभी करणार्या जलमित्राच्या प्रयत्नाने आज रोजी गाव शिवारात वरूणराजाने मागिल वर्षी दाखवलेल्या कृपादृष्टीमुळे व पाणलोट उपचार बर्यापैकी झाल्यामुळे नदी नाले फेब्रुवारी महिन्या अखेर तब्बल तीस ते पस्तीस वर्षानंतर खळखळून वाहत होती.
पाणलोटार्फत झालेल्या १२ सिमेंट बांध तसेच शेवरी शिवारातील पाच मातीनाला बांध जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत खोलीकरण करण्यात आले आहे तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत तीन माती बांध खोलीकरण करण्यात आले आहे. तसेच मागील वर्षी पाणी फाऊंडेशन सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत गावाने भाग घेतला होता यामुळे सरकारी बर्डीलगत डिप सी. सी. टी करण्यात आले आहे तसेच धामणी नदीतील गाळ काढणे तसेच शेवरी शिवारात असलेल्या नाईकनगर येथील शेतकरी बाधवाच्या शेतीच्या लगत असलेल्या जमिन लेव्हल झालेल्या १९७२ च्या दुष्काळात झालेल्या व कधीही खोलीकरण न झालेल्या सहा माती बांध खोलीकरण करण्यात आले आहे या नाल्यांना आजही पाणी असुन लगतच्या विहीरी प्रथमच कमालीच्या भरल्या होत्या त्यामुळे बर्याच दिवसांनंतर शेतकरी बांधवांनी गहू,हरभरा,भुईमूग इ.पिके घेतली व आजही हिरवीगार शिवार दिसत आहेत.या कामासाठी आपल्या गावाचे सुनिल राठोड, न्या.चिंतामण शेळके,लक्ष्मण शेळके,धिरसिग राठोड, दातांचे डॉ.निलेश राठोड ,रमेश निकम इ. भुमिपुत्र जे नोकरी,व्यवसाय निमित्त बाहेरगावी असतांना व आपण गावाचे काहीतरी देणं लागतो ही भावणा ठेवून सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला साद देत आर्थिक तसेच साहित्य रुपाने मदत केली होती.ब्राम्हणशेवगे गावाची भुमिपुत्राच्या मदतीने पाणीदार गावाकडे वाटचाल : खोलीकरण झालेल्या नाल्यानी मार्च महिन्यापर्यंत धरला तगजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीने मागील वर्षी झालेल्या खोलीकरणाचा फायदा दिसत असल्याने या वर्षी आमदार मंगेश चव्हाण,उज्वलकुमार चव्हाण व गुणवंत सोनवणे यांनी सुरू केलेल्या शिवनेरी फाऊंडेशन भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर पाणी साठा या उपक्रमातही गावाने सहभाग नोंदवला असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधव आपल्या शेतालगत असलेल्या माती बांध खोलीकरण करून घेण्यासाठी सरसावले आहेत.यासाठी नुकतीच जलमित्रानी शिवार फेरी केली असता जवळपास सर्वच शेतकरी बाधव खोलीकरणासाठी आग्रही होते. दरवर्षी दुष्काळामुळे होरपळत असल्याने व यावर्षी चांगले पिके घेता आल्याने नाईकनगर येथील शेतकरी ऊसतोडीस स्थलांतरीत न होता आपल्याच शेतात राबताना दिसत आहेत.
चालू वर्षी जर उर्वरित सर्व माती नाले बांध खोलीकरण करणे शक्य झाले तर ब्राम्हणशेवगे गाव नक्कीच पाणीदार, सुजलाम, सुफलाम व स्वयंपूर्ण झालेले असेल यात शंकाच नाही…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button