Chalisgaon

स्काऊट गाईड शिबीर चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलदारवाडी सिद्धेश्वर आश्रम येथे संपन्न

स्काऊट गाईड शिबीर चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलदारवाडी सिद्धेश्वर आश्रम येथे संपन्न

मनोज भोसले

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या उद्देशाने आडगाव (कासोदा) धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे ३ दिवसीय स्काऊट गाईड शिबीर चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलदारवाडी सिद्धेश्वर आश्रम येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिराचा समारोप आज महामंडलेश्वर ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली, पंचायत समिती सभापती सौ.स्मितलताई दिनेश बोरसे, माजी पं.स.सदस्य दिनेशभाऊ बोरसे, प्रा. सुनील निकम सर, राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर, आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
शिबिरामध्ये शाळेच्या ११५ विद्यार्थी – विद्यार्थिनी व १० शिक्षकवर्ग सहभागी झाले होते.

आश्रम परिसरात तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू टाकून निसर्गाच्या सानिध्यात आयोजित या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना व्यायामाचे व शिस्तप्रियतेचे महत्व शिकविण्यात आले.
एक आगळावेगळा प्रयोग म्हणून शिबिरात सहभागी विद्यार्थिनीनी विना भांड्यांचा स्वयंपाक केला होता. त्याचा आस्वाद देखील प्रमुख मान्यवरांनी घेतला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या रांगोळ्यांचे निरीक्षण यावेळी करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button