Jalgaon

Jalgaon Live: धक्कादायक..! दत्तक लेक बाहेर खेळत होती, घरात आईने पोटच्या गोळ्यासह संपवलं आयुष्य..

Jalgaon Live: धक्कादायक..! दत्तक लेक बाहेर खेळत होती, घरात आईने पोटच्या गोळ्यासह संपवलं आयुष्य..

जळगाव घरी कोणी नसताना एका ३६ वर्षीय विवाहित महिलेने आठ वर्षीय मुलीसोबत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील व्यंकटेशनगरमध्ये ही घटना घडली.

हरीविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेशनगरमध्ये दीपक दाभाडे हे तिसऱ्या मजल्यावर राहतात भुसावळ येथे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते रविवारी सकाळी ते आपल्या दोन भावांसह अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यावेळी घरी दीपक यांच्या पत्नी सोनाली आणि मुलगी तेजस्विनी होते. घरात कोणीही नसताना सोनाली यांनी आठ वर्षीय मुलीला छताच्या पंख्याला दोरीने गळफास दिला आणि स्वतः देखील दुसऱ्या दोरीने गळफास घेतला या प्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.लग्नानंतर काही वर्ष आपत्य होत नसल्याने दीपक यांनी मोठे भाऊ जितेंद्र यांची मुलगी काव्याला दत्तक घेतले होते. त्यानंतर दीपक आणि सोनाली या दाम्पत्याला मुलगी झाली. रविवारी ही घटना घडली त्यावेळी काव्या खालच्या मजल्यावर खेळत होती. पत्नी आणि मुलीने गळफास घेतल्याचा मोठा धक्का दीपक यांना बसला आणि त्यांचा रक्तदाब कमी झाला होता.

दाभाडे दाम्पत्यामध्ये कोणताही वादविवाद नव्हता, असे त्यांच्या नातेविकांसह मित्रपरिवाराने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच ते खुलताबाद वेरूळ शनिशिंगणापूर या ठिकाणी देवदर्शन करून परतले होते. त्यानंतरही दैनंदिन कामे नित्य नियमाने सुरू होते. कोणताही वाद नसताना या महिलेने पोटच्या गोळ्यासह आत्महत्या का केली याविषयी सर्वांना प्रश्न पडला आहे. सोनाली यांना मानेचा आणि छाती दुखीचा त्रास होता असे त्यांचे दीर संदीप दाभाडे यांनी सांगितले.

सोनाली यांचे माहेर मालेगाव येथील आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या माहेरचे मंडळी संध्याकाळी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पोहोचले यावेळी त्यांनी सोनालीचा मृतदेह बघताच मोठा आक्रोश केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button