Sangali

सावित्रीमाई ने मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली-प्रा.रणजित शिंदे

सावित्रीमाई ने मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली-प्रा.रणजित शिंदे

राहुल खरात सांगली प्रतिनिधी
३ जानेवारी माता सावित्रीमाई जयंती म्हणजे सावित्रीमाईंचा जन्मदिवस. भारतात मुलींसाठी पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले आणि माता सावित्रीमाई यांनी सुरु केली.आशिया खंडातील सावित्रीमाई या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या.
सदाशिवराव शिंदे इंग्लिश मिडिअम स्कुल पांढरेवाडी दिघंची या प्रशालेच्या वतीने त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने मुलींनी माता सावित्री ची वेशभुषा केली होती.तसेच अन्य मुला मुलींनी पारंपारीक वेशभुषा परिधान करुन दिघंची गावातुन रॅली काढण्यात आली.
शाळेच्या वतीने दिघंची ग्रामपंचायत जवळ दिघंची गावचे सरपंच श्री अमोल मोरे ,उपसरपंच श्री.विकास मोरे,ग्रा.पं.सदस्य श्री प्रणव गुरव ,श्री शिवाजी पवार ,संस्थेचे सचिव श्री प्रकाशभैय्या शिंदे, श्री रणजित शिंदे सर ,शाळेचे प्राचार्य श्री दिलीप पिंजारी सर व इतर मान्यवरांच्या हस्ते माता सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच माता सावित्रीमाईंच्या जीवनावर भाषने लहान मुलींनी सादर केली.त्याचबरोबर नृत्यही सादर करण्यात आले. अशाप्रकारे सदाशिवराव शिंदे इंग्लिश मिडियम स्कुलच्या वतीने माता सावित्रीमाई यांची जयंती उत्साहात पार पडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button