अंगणवाडी कार्यकर्ती अनुसया गंगाराम दिवटे याना यशोदा माता पुरस्काराने सन्मानित
नांदेड प्रतिनिधी( वैभव घाटे)
यशोदा माता पुरस्काराने व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नांदेड.जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘ बेटी बचाव बेटी पढाओ ‘कार्यक्रम तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत देण्यात येणारा यंदाचा यशोदा माता पुरस्कार सगरोळी येथील अंगणवाडी कार्यकर्ती अनुसया गंगाराम दिवटे यांना नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नांदेड जागतिक महिला दिनाच्या औचित्याने एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत सन १९१९-२० या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचा-यांना देण्यात येणारा यंदाचा यशोदा माता पुरस्काराने बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील अंगणवाडी कार्यकर्ती अनुसया गंगाराम दिवटे यांना दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून भक्ती लाॅन्स मंगल कार्यालय नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात मा.ना.श्री.अशोकरावजी चव्हाण मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री, नांदेड जिल्हा,मा.आ.श्री.अमरनाथ राजुरकर,मा.आ.माधवराव जवळगावकर, मा.श्री.अशोक काकडे ,सौ मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर (जिल्हा परिषद . अध्यक्ष )सौ.सुशिला हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, सभापती ( महीला बालविकास समीती जि.प.नांदेड ) जी.जी.गिरगाकर(बालविकास प्रकल्प अधिकारी बिलोरी) जी.ए.गिरी (परिवेक्षीका) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अनुसया गंगाराम दिवटे यांना सन्मान पत्र ,स्मृती चिन्ह देऊन सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






