Latur

भिम आर्मीचे जाणते राज्यप्रमुख मा प्रफुलजी शेंडे यांचे सम्यक संवाद यात्रा निमित्ताने लातुरात आगमन प्रफुलभाई यांच्या आगमनाने लातूरचे कार्यकर्ते प्रफुल्लीत

भिम आर्मीचे जाणते राज्यप्रमुख मा प्रफुलजी शेंडे यांचे सम्यक संवाद यात्रा निमित्ताने लातुरात आगमन प्रफुलभाई यांच्या आगमनाने लातूरचे कार्यकर्ते प्रफुल्लीत

लक्ष्मण कांबळे लातूर

लातूर : संबंध महाराष्ट्र भर भिम आर्मीचे जाणते राज्य प्रमुख समाजरक्षक कर्मयोद्धा मा प्रफुलभाई शेंडे याच्या नेतृत्वाखाली सम्यक संवाद यात्रा च्या माध्यमातून कार्यकार्याच्या आढावा बैठक व कार्यकर्त्यांशी संपर्क साधता या म्हणून या संवाद यात्रेचे आयोजन केले आहे .ही संवाद यात्रा काल दिनांक १२जुलै रोजी लातुर च्या मातीत चौखुर झाली असता.
लातुर च्या कार्यकर्त्यांनी मा प्रफुल्ल भाई शेंडे यांचे फटाक्यांची गगनभेदी आतिषबाजीत आणि जयभीमच्या बुलंद जयघोषात भव्यदिव्य स्वागत करन्यात आले.
यावेळी भिम आर्मीच्या वतीने रक्तदान शिबिराचे ही नियोजन करण्यात आले होते .यावेळी लातुरात मा प्रफुलभाई यांचेसमवेत भिम आर्मीचे तेल लावलेले पैलवान महाराष्ट्र राज्याचे युवा नेते मा उत्तरेश्वरजी कांबळे, महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षित प्रवक्ते मा ,रमाकांतजी तायडे, महाराष्ट्र राज्याचे आक्रमक युवा नेते मा आक्षयजी धावारे ,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष मा विनोदभाऊ कोल्हे,राज्य सचिव मा अमोलभाई चिमनकार, मराठवाडा विभागीय संघटक मा मिलिंदजी ढगे, लातुर जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे, नागपूर उपाध्यक्ष मा नरेंद्रभाई शेंडे,तसेच विद्रोही भिम सैनिक मा रोहितभाई नंदेश्वर यांच्यासह इतर भिम आर्मीचे पदाधिकारी -कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती,
वरील सम्यक संवाद यंत्राचे कार्यक्रमाचे नियोज लातुर येथील सुप्रसिद्ध भालचंद्र ब्लड बँक( हॉल ) येथे करण्यात आले होते या वेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा विनोदभाऊ कोल्हे यांनी केले,तर राज्यप्रमुख प्रफुलभाई शेंडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सम्यक संवाद यात्रा” लातुर जिल्ह्यात आल्याच्या आ आनदीप्रीत्यर्थ भिम आर्मी लातुर जिल्हा कमिटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते, ह्याच कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या या कार्यक्रमास लातुर जिल्हातील शेकडो पदाधिकारी -उपस्थित होते, असे क्रांतीसाथी भिम पँथर मा राजेश गवळी भिम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य प्रचार -प्रसिद्धी प्रमुख यांनी माहिती दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button