रॉयल वाईन शॉप अनेक दिवसांपासून बंद मग मद्य साठा गेला कुठे??
चौकशीची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले –
चाळीसगाव शहरातील खरजई रोडवरील पेट्रोल पंपाशेजारी असलेले रॉयल वाईन शॉप हे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या लॉकडाऊन मध्ये जवळपास सर्वच बिअर शॉपी व वाइन शॉप बंद करण्यात आले होते असे असताना देखील शहरात काळ्या बाजारात मद्याविक्री सुरू होती त्यावेळी दारूबंदी विभागाने शहरातील क्रिश वाईन शॉपची तपासणी केली होती.
त्यात तफावत आल्याने त्या वाईन शॉप चा परवाना रद्द करण्यात आला होता त्यानंतर वाईन शॉप ठराविक वेळेत उघडण्याची परवानगी मिळाल्यावर चाळीसगाव शहरातील वाईन शॉप उघडण्यात आले व विक्री देखील करण्यात आली मात्र शहरातील खरजई रोडकरी रॉयल वाईन शॉप फक्त 2 दिवस सुरू होते ते देखील जास्त गर्दी असल्या ठरावीक वेळेत सादर वाईन शॉप उघडण्यात आल्याने अनेक मद्यापीना दारू उपलब्ध झाली नाही व कालपर्यंत हे वाईन शॉप बांदा होते, परवाना असतांना वाईन शॉप बंद का असा सवाल अनेक मद्यापीनी उपस्थित करून दुकानातील मद्यासाठा विक्री झाला किंवा तसाच आहे याबाबत रॉयल वाईन शॉपचे संबंधित व्यक्तीशी विचारणा केली असता त्यांनी अनेक उत्तरे दिली ती न पटण्यासारखी आहेत. गर्दी अभावी वाईन शॉप बंद असावे, किंवा माल संपला असावा अशी उत्तरे त्यांनी दिली त्यामुळे रॉयल वाईन शॉपचा लॉकडाऊन च्या आगोदर सील करताना किती मद्यासाठा होता त्यानंतर मद्याविक्री परवाना मिळाल्यावर किती साठा शिल्लक होता आणि उघड्या वेळेत किती मद्य साठा मागवण्यात येऊन त्यात किती मद्य विक्री झाले हे मात्र पूर्णपणे समजून आले नाही.
याबाबत चाळीसगाव विभागाचे दारूबंदी विभागाचे लक्ष्मी नगरमधील कार्यालयात जाऊन निरीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेक दिवसांपासून कार्यालय बंद असल्याचे दिसून आले शिवाय दारुबंदी निरीक्षक श्री पाटील यांचा मोबाइल देखील नॉट रीचेबल असल्याने याबाबत माहिती मिळू शकली नाही.






