सर्वसामान्य जनतेच्या प्रवाशी पॅसेंजर गाड्या तातडीने सुरू कराव्यात — रेल्वे बोर्ड चेअरमन श्री सुनीत शर्मा यांच्याकडे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली मागणी
दिल्ली : आज दिल्ली येथे रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री. सुनित शर्मा यांची भेट घेतली. *सर्वसामान्य जनतेच्या प्रवाशी गाडी असलेल्या देवळाली भुसावळ शटल सेवा,मुंबई भुसावळ पॅसेंजर, चाळीसगाव धुळे पॅसेंजर, पाचोरा जामनेर पिजे , भुसावळ सुरत पॅसेंजर या सर्वसामान्यांच्या हक्काच्या प्रवाशी गाड्या तातडीने सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले.* चाळीसगाव शहराजवळ असलेला वेल्डिंग बट फ्लॅश कारखाना जामदा रेल्वे स्टेशन परीसरात स्थलांतरित करावा.यासह *जळगाव, पाचोरा, कजगाव,चाळीसगाव, अमळनेर,धरणगाव* या रेल्वे स्टेशन वर स्पेशल ट्रेन्स यांना थांबा देण्यात यावा.तसेच मतदारसंघातील रेल्वे मार्गांवरील रेल्वे अंडर ब्रिज, रेल्वे ओव्हर ब्रिज तसेच विविध समस्यांबाबत चेअरमन यांच्याशी चर्चा करून त्या सोडविण्याची मागणी केली. रेल्वे बोर्ड चेअरमन सूनीत शर्मा यांनी सर्व मागण्या सोडविण्यासंदर्भात सहमती दर्शविली.






