Chalisgaon

बाणगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध…नूतन सदस्यांचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

बाणगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध…नूतन सदस्यांचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

नितीन माळे चाळीसगाव

चाळीसगाव : गावाच्या विकास व शांततेसाठी जास्तीत जास्त गावांनी आपल्या निवडणुका सामंजस्याने बिनविरोध कराव्यात या चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळून तालुक्यातील १० ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यातील बाणगाव येथील बिनविरोध निवडून आलेल्या नुतन सदस्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची त्यांच्या अंत्योदय कार्यालयात भेट घेतली. आमदार मंगेशदादा यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या विकासासाठी आपण दाखविलेले सामंजस्य कौतुकास्पद असून विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले.
अंत्योदय जनसेवा कार्यालयात झालेल्या या छोटेखानी सत्कार सोहळ्याला बाणगावचे माजी सरपंच धनराज शेलार सर, लाला परदेशी, समाधान शेलार, छोटु पहिलवान, विजय पवार, राजू पवार, दत्तू आबा पाटील, विशाल धनराज शेलार, सूर्यकांत धनराज शेलार, ईश्वर शेलार, अशोक शेलार, भाईदास शेलार, अरविंद परदेशी, विजय परदेशी, भैय्या मिस्तरी यांच्यासह
बिनविरोध झालेले सदस्य

1अरविंद भरत परदेशी, 2मनीषा अरविंद परदेशी, 3 गंगुबाई भगवान कुंभार, 4 वंदना ईश्वर शेलार, 5 आशाबाई नामदेव सोनवणे, 6 भाईदास दगा गोलाईत, 7 पांडुरंग बन्सी गोपाळ, 8 देवमन सुखदेव पवार 9 शामबाई बबन गायकवाड हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button