Chalisgaon

ब्राम्हणशेवगे गाव रोटरी क्लबच्या माध्यमातून पाणीदार होणार :पोकलॅन्ड मशीनद्वारे नालाखोलीकरणच्या कामांना जोर : शेतकरी बांधवांनी कंबर कसली..

ब्राम्हणशेवगे गाव रोटरी क्लबच्या माध्यमातून पाणीदार होणार :पोकलॅन्ड मशीनद्वारे नालाखोलीकरणच्या कामांना जोर : शेतकरी बांधवांनी कंबर कसली..
सोमनाथ माळी

ब्राम्हणशेवगे ता. चाळीसगाव येथे दि.१७ एप्रिल २०२० पासून रोटरी क्लब च्या माध्यमातून व मा.उज्वल कुमार चव्हाण सर ,गुणवंत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण रोटरी क्लबेचे डॉक्टर संदिप देशमुख याचे मार्गदर्शनाखाली पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले आहे. या मशिनच्या माध्यमातून आज दि.२७ एप्रिल २०२० पर्यत ११ दिवसाच्या कालावधीत रामकृष्ण पुडलिक शेळके यांचे शेतालगत एक ईनलेट आऊटलेट शेततळे, सिताराम पाटील यांचे शेतालगत नालाखोलीकरण करण्यात येऊन १५० ट्रक्टर गाळ टाकण्यात आला आहे.
तसेच रमेश निकम,धारा भानुदास राठोड, प्रकाश पंडीत राठोड, जगराम मानसिंग राठोड, नागु ममराज राठोड,मोरसिग केशव चव्हाण चुडामण परबत चव्हाण यांचे शेतालगत नालाखोलीकरण ,रूदीकरण काम करण्यात आले आहे.

ब्राम्हणशेवगे येथील नाईकनगर मधील शेतकरी बाधवाच्या शेतजमिनी ह्या शेवरी शिवारात असून या ३५ ते ४० मातीनाले बाद असुन ते बाधकाम झाले पासुन या शिवारात अद्याप कुठल्याही शासकीय योजनेद्वारे पाणलोट असो जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत असो खोलीकरण व रूदीकरण झालेले नव्हते. त्यामुळे हे नाले जमिन लेव्हल झाल्याने असुन नसल्यासारखे झाले होते.

परंतु शिवनेरी फाऊंडेशन,भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर पाणी साठा ही पाण्यासाठीची चळवळ चाळीसगाव चे भुमिपुत्र उज्वल कुमार चव्हाणसर,गुणवंत सोनवणे व आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सुरू झाली असुन आज रोजी रोटरी क्लब ने पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले आहे ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते लोकसंघर्ष मोर्चा चे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत ब्राम्हणशेवगे येथील ही सर्व कामे मार्गी लागत आहेत.त्यामुळे येथील शेतकरी बाधवाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होऊन हे शिवार व गाव *पाणीदार* होऊन सुजलाम सुफलाम होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button