ब्राम्हणशेवगे येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद बसफेऱ्या पुर्ववत सुरु करा: ब्राम्हणशेवगे विकास मंचचे आगार प्रमुखांना निवेदन..
सोमनाथ माळी चाळीसगाव
चाळीसगाव : तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील बसफेऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या होत्या. परिस्थिती पुर्ववत होत असल्याने काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. पण काही अद्याप सुरू नाहीत.
शाळा, काँलेज,क्लासेससाठी विद्यार्थी, वैद्यकीय उपचारासाठी जेष्ठ नागरिक, महिला,काही प्रवासी वर्गाला तालुक्याच्या ठिकाणी येणे जाणे गरजेचे असते.काही प्रवाशांना बस हेच एकमेव प्रवासाचे साधन असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. चाळीसगाव येथे उच्च शिक्षणासाठी जवळपास चाळीस ते पन्नास विद्यार्थी दररोज ये जा करतात.त्या विद्यार्थीनी विद्यार्थ्यांना गेली महिण्यापासून बस बंद असल्याने डोणपिंप्री बससाठी दिड ते दोन किमी पायपिट करावी लागत आहे. तसेच काही वाहक या विद्यार्थ्यांना पास चालत नाही असे सांगून तिकीट काढण्यास सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास असुन पायपीट व तिकटे काढण्यामुळे नाहक शारीरिक व आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे. आगार व्यवस्थापनाला वेळोवेळी विद्यार्थी व प्रवाशांनी बंद बसफेऱ्या पुर्ववत सुरू करण्याबाबत विनंती केली असतांना टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
सदर बंद.बसफेऱ्या पुर्ववत सुरू करण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन ब्राम्हणशेवगे विकास मंचचे सोमनाथ माळी व विद्यार्थ्यानी आगार प्रमुख संदिप निकम यांना दिले आहे.






