सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांना “समाज चेतना पुरस्कार २०२०” जाहिरनितीन माळेब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोकसंघर्ष मोर्चा चे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांना बंजारा समाज बहुऊद्देशिय संस्था टाकळी प्र.चा.ता.चाळीसगाव यांचे तर्फे दरवर्षी स्व.घेवरचंद सवजी राठोड यांचे स्मरणार्थ दिला जाणारा “समाज चेतना पुरस्कार २०२० जाहिर झाला आहे. हा पुरस्कार जलसंधारण व वृक्षारोपण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल जाहिर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि.२७ सप्टेंबर २०२० रोजी क्रांतीकारी संत सेवालाल महाराज विचार व प्रबोधन मिशन आणि सेंटर टाकळी प्र.चा.ता.चाळीसगाव येथे मान्यवरांचे उपस्थितीत व हस्ते दिला जाणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोमनाथ माळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.






