Chalisgaon

आमदार पडळकरांच्या वक्तव्याचा #निषेध करीत ‘जोडेमार’ आंदोलन; राष्ट्रवादीचा कॉंग्रेस पक्ष संतप्त, शरदचंद्र पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान

आमदार पडळकरांच्या वक्तव्याचा #निषेध करीत ‘#जोडेमार’ #आंदोलन; राष्ट्रवादीचा कॉंग्रेस पक्ष संतप्त, शरदचंद्र पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान

मनोज भोसले

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद आज चाळीसगाव शहरात उमटले. शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस ‘जोडेमार’ आंदोलन करण्यात येवून पडळकरांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

भाजपाच्या असभ्य संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन आमदार गोपीचंद पडळकरांच्या वाचाळ वक्तव्याचा माध्यमातून झालेले आहे. देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात आले असून स्वतःचे कोणतेही कर्तृत्व नसलेल्या पडळकर यांनी आपल्या वयाचे भान न ठेवता देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिका केली असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देशाला कृषी, संरक्षण, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांत एका उंचीवर नेऊन ठेवले असून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे हे एक नेतृत्व आहे. या नेतृत्वाच्या वयाचा व अनुभवाचा विचार केल्यास पडळकर यांचे वयाएवढे पवार यांचे राजकीय कार्य देखील नाही, याचे भान आमदार पडळकरांनी ठेवायला हवे होते. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर व्यक्तव्य करणे म्हणजे निव्वळ बालिशपणा असून चाळीसगाव शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पडळकरांच्या प्रतिमेस ‘जोडेमार’ आंदोलन करण्यात येवून निषेध नोंदविण्यात आला.

‘पडळकर हाय हाय’, ‘या बालीश पडळकरचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘असभ्य संस्कृतीचा निषेध असो’, आदी घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शाम देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समिती सभापती अजय पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, दिपक पाटील, प्रशांत पाटील, युवक उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शहर उपाध्यक्ष सुजित पाटील, योगेश पाटील, राकेश राखुंडे, श्रीकांत राजपूत, दिपक सुर्यवंशी, गुंजन मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button