Karnatak

? ठोस प्रहारचा दणका… शाळेला आली जाग.. दहावीच्या विद्यार्थ्यांना सोयाबीन काढणाऱ्या शिक्षिकेला केले निलंबित

दहावीच्या विद्यार्थ्यांना सोयाबीन काढणाऱ्या शिक्षिकेला केले निलंबित

हुलसूर/प्रतिनिधी-महेश हुलसूरकर

कर्नाटकात कोरोना मुळे सर्वत्र शाळा हे पुर्णतः बंद होते पण कर्नाटक सरकारने शाळा ही (वटार शाळा) शाळेच्या खुल्या वातावरणात घेण्याची माहिती दिली होती पण याचा गैरवापर करीत प्रकार सोयाबीनचे बींग फुटले आहे.
हुलसूर येथील प्रतिष्ठित शाळा तसेच नावाजलेली शाळा पण आता पर्यंत शाळेतील शिक्षक हे देव स्वरूप पाहिले जात होते पण आता नवीन शिक्षक आलेले हे विद्यार्थ्यांना घडवीण्याचे काम सोडून विद्यार्थाच्या हातात विळे देऊन सोयाबीन काढण्यासाठी शेतात मजुरीने घेऊन गेलेली लाजीरवाणी घटना हुलसूर येथे घडली आहे.
हुलसूर येथील श्री संत रघुनाथ महाराज विद्यालया मधील शिक्षिका सौ.मोहीनाबाई विठोबा झाकडे याचे पती तुकाराम यांनी दि.२ आक्टोबंर व ३ आक्टोबंर दोन दिवस सात दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत न बसु देता शेतात सोयाबीन काढण्यासाठी ३०० रुपये मजोरीची लाच दाखवत शेतातील सोयाबीन काढुन घेतले व शेतातील सोयाबीन काढण्याचा विद्यार्थाच्या पालकांना याचा पत्ता देखील नाही पालक ही माहिती ऐकून आचंबीत झाले आहेत.
शिक्षिका मोहीनाबाई याचे पती हे तुकाराम यांनी सविस्तर माहिती दिली की माझी पत्नी ने विद्यार्थ्यांना घेऊन आढीच एकर सोयाबीन काढण्यासाठी शाळेतून माझ्यासोबत पाढवुन दिली आहे अशी माहिती दिली त्यांना प्रश्न विचारला असता ईतकच तुम्ही का विद्यार्थ्यांना काम दिले विचारना केले असता तुम्हाला काय करायचे आहे ते करा कोणीही काही करत नाही माझे असे उडवाउडवीची उत्तरे दिली.
शाळेत विद्यार्थ्यांना पुर्व सुचना दिली गेली होती की तुम्ही शाळेत उपस्थित न देता शेतात येवून काम करा व घरीही सांगु नका असे शिक्षिका विद्यार्थ्यांना बजावले होते या भिती पोढी आम्ही शाळेला न जाता शेताला आल्याचे विद्यार्थी सांगत होते.
दि.६ मंगळवारी गटशिक्षणाधिकारी संजुकुमार कांगे व सीडीपीओ शारदा कलसकर यांनी शाळेला भेट दिली हा सर्व प्रकार माहिती ही पत्रकार माध्यमातून मिळाली आहे पण शाळा ही सुचना का दिली नाही धारेवर धरत विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन विचारले असता विद्यार्थी ही हो आम्हाला मँडमने सांगितले होते की सोयाबीन काढायला पाढवले होते सर्व पुरावे समोर येताच गटशिक्षणाधिकारी संजुकुमार कांगे यांनी मोहणाबाई विरुद्ध डीडीपीआय ला माहिती दिली व दि.७ रोजी त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
ठोस प्रहार च्या मुळे शिक्षण विभागाला जाग आली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button