Dombivali

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गजब कारभार… मूलभूत सुविधा दुर्लक्षित करून धोकादायक अनाधिकृत कामासाठी प्रोत्साहन …

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गजब कारभार… मूलभूत सुविधा दुर्लक्षित करून धोकादायक अनाधिकृत कामासाठी प्रोत्साहन …

पी व्ही आनंद

तळ मजला घरी सांडपाणी वाहून नेण्यासाठी केलेली सुविधा पुर्णपणे बंद पडलेली असल्याने चारही बाजूला सांडपाणी जमा झालेले दुर्लक्षित करून त्याच ईमारतीचे छताचे अनाधिकृत धोकादायक बांधकामाला प्रोत्साहन देण्याचा प्रकार J4 वार्ड अधिकारी यांच्या आशिर्वादाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये होताना दिसत आहे.मागील आठ वर्ष सातत्याने पाठपुरावा करुनहि तळमजल्या मधिल सांडपाण्याची निचऱ्याची व्यवस्था वेळीच न केल्याने तेथील वयोवृद्ध 80 वर्षाचे रहिवाशी यांच्या घरात ते सांडपाणी घरामध्ये जात असल्याने त्यांना त्या त्रासाला नाहक सामोरे जावे लागत असून त्यांच्या सह सर्व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तेथे उपस्थित झाला आहे. बांधलेले चेंबर हे सांडपाणी सोडण्याकरता टाकण्यात आलेल्या पाईपलाईन पेक्षा अधिक उंचीवर असल्याने सांडपाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते तेथेच जमा होते आणि रहिवाश्यांच्या घरात जात आहे.याबाबत ईमारतीच्या सोसायटीच्या सभासदांनी या समस्येवर उपाययोजना करण्यापेक्षा त्यांना छतावर अनाधिकृत सभागृह बांधण्यात अधिक रस असल्याचे ईमारतीच्या त्रस्त रहिवाशी यांचे म्हणने आहे.तर दुसरीकडे वारंवार तक्रार करून हि तक्रारीची दखल न घेता ईमारतीच्या अनाधिकृत छतावरील सभागृहाकरता शेड सलग्न कामाला समर्थन वार्ड अधिकारी यांच्या कडून केले जात असल्याचे हि रहिवाशांनी सांगितले आहे. दोन वर्ष पुर्वी आरोग्य खात्याने सदर चेंबर दुरिस्तीचे आदेश दिले होते परंतु त्या आदेशाचे हि अधिकारी वर्गाकडून पालन होताना दिसत नाही.

छताचे ड्रेलिंग करून ईमारतीस व रहिवाशांना जीवीतास धोका निर्माण होत असताना त्यासंदर्भात तपशील न करता रहिवांश्याची दिशाभूल करण्याचे काम केडिएमसी का करते ? असा संतप्त प्रश्न हि त्रस्त रहिवाशी विचारत आहे. जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करून केडिएमसी अधिकारी अशा अनाधिकृत बांधकामाना महत्व देत असतील तर अश्या परिस्थितीत पिडीत कुटुंबानी कोणाकडे दाद मागवी हा प्रश्न हि आज रहिवाशी यांच्या त्रासलेली अवस्था पाहून पडतो आहे.
Dwaraka kunj,katemanevali naka ,Kalyan east

Leave a Reply

Back to top button