?अत्यंत घृणास्पद ! मुकबधीर तरुणीवर अत्याचार , नंतर दगडान ठेचून केली निर्घृण हत्या
नांदेड : एका 27 वर्षीय मूकबधीर तरुणीवर अत्याचार करून तिची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे काल रात्री उशीरा तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडली आहे. या घटनेमुळे बिलोली शहरात तणाव पसरला आहे. बिलोली पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, मृत तरुणी झोपडपट्टी भागातील रहिवाशी होती. पाच वर्षापूर्वी तिच्या आई-वडिलाचं निधन झालं होतं. तेव्हापासून तिची चुलत बहीण तिचा सांभाळ करत होती. पीडितेची बहीण रोज कामाला जात असे, तेव्हा मृत तरुणी एकटीच घरी असायची. काल (9 डिसेंबर) सायंकाळी बहीण घरी आली तेव्हा मृत तरुणी घरी नव्हती.
तिनं आजूबाजूला आपल्या बहिणीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. घरात शौचालय नाही म्हणून मृत तरुणी जिल्हा परिषद शाळेच्या मागील झुडपात शौचालयासाठी जात असे. तिथंही तिला शोधण्यात आलं. मात्र ती आढळून आली नाही. अखेर रात्री उशीरा तरुणीचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक म्हणजे पीडितेचा चेहरा भल्या मोठ्या दगडानं ठेचण्यात आला होता. तिच्या मांड्या देखील उघड्या होत्या.
पीडितेच्या चुलत बहीणीनं याबाबत माहिती नातेवाईकांना कळवली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
शेजारच्या साईनाथवर संशय
दरम्यान, शेजारी राहणाऱ्या साईनाथ नामक युवकावर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. साईनाथ हा नेहमी तिची छेड काढत होता. तिचा हात धरायचा. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पीडिती दुपारी शौचालयासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमागिल झुडपात गेली असावी. तेव्हा साईनाथनं तिच्यावर अत्याचार करून पुरावा मिटवण्यासाठी तिचा खून केल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. त्या घडनेनंतर बिलोली पोलिसांनी आरोपी साईनाथ विरोधात खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बिलोली शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे.






