Nanded

साईबाबा विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार,पाच जणांवर गुन्हा दाखल

साईबाबा विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार,पाच जणांवर गुन्हा दाखल

बिलोली तालुक्यातील रामतिर्थ येथील घटना

नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे

बिलोली दिं. १८ जानेवारी

बिलोली तालुक्यातील रामतिर्थ येथील साईबाबा विद्यालयात सातव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर येथील लिंगपिसाट शिक्षक सय्यद रसुल व दयानंद राजुळे यांनी शारिरीक शोषण केल्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार घडला असून पिडीत मुलीला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत.

साईबाबा विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार,पाच जणांवर गुन्हा दाखल

पिडीत विद्यार्थिनीची प्रकृती सुधारत असल्याची माहिती असून सदर प्रकरणातील मुख्य दोन शिक्षक आरोपी व त्यास सहकार्य करणा-या तीन आरोपी विरूद्ध रामतिर्थ पोलीस ठाण्यात भादवि 376 D,376,2n,506,34 भा.द.वि.बालकांचे संरक्षण कलम 4 ,6 ,8, 10, 21,सह कलम 3 1w, 3 25a अनुसुचित जाती कायदा अॕट्रासिटी अॅक्ट नुसार रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस आधिकारी सिध्देश्वर धुमाळ व स.पो.नि. सोमनाथ शिंदे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button