Chalisgaon

चाळीसगाव येथे शिवनेरी फाऊंडेशन तर्फे कार्यशाळा संपन्न…

चाळीसगाव येथे शिवनेरी फाऊंडेशन तर्फे कार्यशाळा संपन्न…

सोमनाथ माळी चाळीसगाव

चाळीसगाव : येथे शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान अंतर्गत, सहज जलबोध अभियान चाळीसगांव आणि पंचायत समिती चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांसाठी गट विकास अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन दि.२२डिसेंबर २०२० रोजी पंचायत समितीच्या डि.आर.डी.ए.हाल येथे करण्यात आले. त्यासाठी भूजल अभियानाचा परिचय गुणवंत सोनवणे यांनी ऑनलाइन पद्धतीने करून दिला. त्याच बरोबर सहज जलबोधकार उपेन्द्र दादा धोंडे यांनी सहज जलबोध अभियान नेमकं काय त्याची रूपरेषा स्थानिक पातळीवर कोणती कामे चालणार आहेत त्यासाठी भूजल टीम काय काय करेल सहज जलबोध तंत्र कस असेल याची सखोल माहिती ग्रामसेवक व अधिकारी वर्गाला करून दिली. आदर्श भूजल आराखडा ही संकल्पना महेंद्र पाटील सर यांनी मांडली. त्याचबरोबर निसर्ग बेट संबंधातील सखोल माहिती, श्री राहुल राठोड यांनी दिली. याचबरोबर मनरेगा जलसंवर्धन व पुढील नियोजन यासंदर्भात अमूल्य असे मार्गदर्शन तालुक्याचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले खर तर जलसंधारण आणि मृदा संधारणाचीही कामे ग्राम पातळीवरती करणे गरजेची असतात आणि रूट लेवल ची संपूर्ण माहिती ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनाच जास्त असते त्यांनी या कामासाठी पुढे यावे आणि भूजल अभियाना ला सर्वोतोपरी मदत करावी असे आवाहन गट विकास अधिकारी यांनी केले तसेच सूत्र संचलन भूजल अभियान टिम प्रमुख विजय कोळी यांनी केले तर सम्राट सोनवणे यांनी आभार मानले. सदर कार्यशाळेला तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button