हिरापुर ते ब्राम्हणशेवगे रस्त्याची दुर्दशा :सार्वजनिक बांधकाम विभाग व जि.कडून टोलवाटोलवी : निकृष्ट कामाची चौकशी होऊन कारवाईची मागणी
सोमनाथ माळी हिरापूर
चाळीसगाव : हिरापुर ते ब्राम्हणशेवगे या नऊ किमी रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली असून दहा ते अकरा वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून डाबरीकरण झाले असून यावेळी ब्राम्हणशेवगे गावापासून ते पाटचारी पर्यंत जवळपास दिड किमी रस्ता डाबरीकरण न करता तसाच सोडून दिलेला आहे. या रस्त्याचे डाबरीकरण व्हावे याची मागणी होत आहे.काही दिवसांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. निकृष्ट काम झाल्याने पहिल्याच पावसाने सदर रस्त्याची चाळण झाली आहे.सदर रस्त्याचे डाबरीकरण व्हावे यासाठी लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिद्धीप्रमुख सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.संबंधित दोन्ही विभागाकडून फक्त टोलवाटोलवी सुरू आहे..याअनुषंघाने सार्वजनिक बांधकाम विभागास १८/१/२०२० रोजी अर्ज केला होता त्यानुसार विभागाने २२/१/२०१६ रोजीच्या पत्रात नमुद केले आहे की,सदर रस्ता उविभागाच्या अखत्यारीत नाही. सदरचा रस्ता हा उप अभियंता जि.प.उपविभाग, चाळीसगाव अंतर्गत येत असुन सदर रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे त्याच्यामार्फत करण्यात येतात असे नमुद केले आहे.त्याअनुषंगाने दि.५/२/२०१६ रोजी उपविभागीय अभियंता, जि.प.बाधकाम उपविभाग, चाळीसगाव यांना पत्र दिले होते. त्यामुळे त्यांनी दि.,२५/२/२०१६ रोजी पत्रात नमूद केले आहे की,सदर रस्ता जि.प.च्या मालकीचा असुन सदर रस्त्याच्या डाबरीकरणाचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झाल्याचे नमूद केले आहे. सदर रस्त्याची सध्या दुर्दशा झालेली असून काही दिवसांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती परंतु पहिल्याच पावसात निकृष्ट दर्जाचे काम असल्याने चाळण झाली आहे.त्यामुळे पुन्हा दि.,१५/१२/२०२० रोजी सदर रस्त्याचे डाबरीकरण व्हावे व निकृष्ट डागडुजी कामाची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी तक्रार निवारण पोर्टलवर आनलाईन तक्रार करण्यात आली आहे.त्याअनुषंगाने जि.प.बाधकाम उपविभाग, चाळीसगाव यांनी दि.२३/१२/२०२० रोजीच्या पत्रात नमूद केले आहे की,हिरापुर ते ब्राम्हणशेवगे ह्या रस्त्याचे काम जि.प.मार्फत सुरू नसुन ते सार्वजनिक बांधकाम विभाग, चाळीसगाव यांचे मार्फत सुरू असून सदर बाब या कार्यालयाशी निगडीत नाही. असे नमुद केले आहे.वास्तविक मागणी काय?तक्रार काय आहे?या गोष्टीकडे सोईस्कर दुर्लक्ष करून कानाडोळा केला जात आहे.या रस्त्यावर सध्या कुठलेही काम सुरू नसताना जि.प.मार्फत सुरु नसुन सार्वजनिक बांधकाम विभाग, चाळीसगाव मार्फत सुरू असल्याचे पत्रात नमुद करणे म्हणजे “आंधळ दळत आणि कुत्रे पिठ खाते’ असाच प्रकार म्हणावा लागेल.






