Malshiraj

कन्हेर येथे दलित महासंघाच्या शाखेचे उद्घाटन

कन्हेर येथे दलित महासंघाच्या शाखेचे उद्घाटन

प्रतिनिधी प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
दि ११/३/२०२०
श्री संत तुकाराम महाराजांच्या बिजे निमित्त कन्हेर ता माळशिरस येथे दलित महासंघ शाखा उद्घाटन सोहळा व कन्हेरसिध्द बहुउद्देशीय संस्थेच्या वारकरी शिक्षण संस्थेचा भुमिपुजन समारंभ दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे यांच्या हस्ते व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मच्छिंद्र सकटे साहेब यांच्या व केरबा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कन्हेर येथे दलित महासंघाच्या शाखेचे उद्घाटन

डॉ मच्छिंद्र सकटे साहेब यांनी राज्यातील मातंग समाजातील लोकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात चळवळी माध्यमातून रान उठवले आहे. मातंग समाजाला राजकीय, सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी अतोनात कष्ट केले असुन दलित महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नाविषयीच्या जनजागृती केली आहे. म्हणून दलित महासंघाप्रती प्रेरीत होऊन संघटन करून कन्हेर येथील युवकांनी शाखा उद्घाटन सोहळा व कन्हेर सिध्द बहुउद्देशीय संस्थेच्या वारकरी शिक्षण संस्थेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.शिक्षण संस्थेचा भुमिपुजन कार्यक्रम युवासेना अकलूज शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे यांच्या हस्ते संपन्न झाला.दलित महासंघ शाखा उद्घाटन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला.कन्हेर गावचे कीर्तनकार माऊली मिसाळ यांना दलित महासंघच्या समतावादी सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडीचे पत्र दलित महासंघाचे उपाध्यक्ष केरबा लांडगे यांच्या हस्ते देण्यात आले.

कन्हेर येथे दलित महासंघाच्या शाखेचे उद्घाटन

त्यावेळी राजाभाऊ खिलारे,केरबा लांडगे धनाजी साठे,बच्चन साठे, उपस्थित होते.शाखा अध्यक्ष दत्तात्रय मिसाळ शाखा उपाध्यक्ष पपु मिसाळ, सचिन भिसे,ज्ञानेश्वर धाईंजे, परशुराम मिसाळ, अरुण मिसाळ, शंकर मिसाळ,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.कन्हेर गावचे ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button