तब्बल नऊ वर्षानंतर आदिवासी विद्यार्थाना न्याय…!
स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय,नागपूर येथिल प्रकार.
आदिवासी विद्यार्थी संघाच्या मध्यस्थितीने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नागपूर यांच्या समक्ष समस्येची सोडवणूक.
प्रतिनीधी-मुकेश नैताम
नागपूर
आदिवासी विकास विभागा मार्फत आदिवासी विद्यार्थाकरिता वसतीगृह योजना राबविले जाते त्याच्या योजनेच्या आधारे गरीब होतकरु विद्यार्थाना महाविद्यालयीन प्रवेश प्रकिया पूर्ण केल्यानंतर वसतीगृहात प्रवेश दिला जातो.त्याच अनुसगांने आदिवासी विकास विभागामार्फत विद्यापीठ/ महाविद्यालयीन खर्च जसे-शैक्षणिक सहल,लघूशोध निंबंध अहवाल,रास्ट्रीय ग्रामीण शिबीर,गणवेशांशी संबधित अनेक देयके महाविद्यालयाच्या शिफारशीनुसार वसतीगृहांतर्फे सदर देयके विद्यार्थानी सादर केल्यास आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व देय रक्कम विद्यार्थाना आधार सलग्न बैंक खात्यात वळती केल्या जातो मात्र सदर महाविद्यालयाने तब्बल नऊ वर्षापासून शासन निर्णय लागू झाल्यापासून त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या प्रकार झालेला आहे असा आरोप आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मुकेश नैताम यांनी केला आहे.

झालेला सर्व प्रकार शैक्षणिक क्षेत्राला व आदिवासी विद्यार्थाना वेठीश धरण्याचा प्रकार दिसतो असे महाविद्यालयाचे विद्यार्थी भूषण श्रिरामे,मंगेश इवनाते,प्रवीण कलगे, सूर्यभान श्रिरामे,भूषण जुगनाके,विशाल ताराम,कार्तिक मडावी,देवराज बागडेरिया आदि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयात ऐकून 85% टक्के आदिवासी विद्यार्थी प्रवेशित आहेत सर्व प्रवेशित विद्यार्थाना अनेक वर्षापासून झालेल्या प्रकारावर समाधान व विषय मार्गी लागला यांच् समाधान विद्यार्थाना आहे हे एका विद्यार्थाने सांगितले.

झालेला प्रकारे पुन्हा होता कामा नये अशी तंबी उपस्थित महाविद्यालयीन कर्मचारी यांना प्रकल्प अधिकारी डिगाबर चव्हाण यांनी दिला आहे व या प्रकारे असा प्रकार पुढे झाल्यास विद्यापीठाला अवगत करुण सर्व आदिवासी विद्यार्थाना इतरत्र महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल असा सज्जग ईशारा प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांनी दिला आहे.






