बनावट कागदपत्रे सादर करून जमीन लाटल्याचा माजी जि.प सदस्यावर आरोप,,
मनोज भोसले
चाळीसगाव :- बनावट कागपत्रे तयार करून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव यांनी वडिलोपार्जित जमीन हडप केल्याचा आरोप पत्रपरिषदेत मंगलदास जाधव आणि अशोक जाधव यांनी केला आहे.
येथील आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर उद्यानात गिरीधर खंडू जाधव व फकिरा वेडू जाधव यांच्या वारसांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नगरपालिका हद्दीतील शेत सर्व्हे नंबर 374 आणि 375 ही मालेगाव रोड लगत असलेली भोगवटा क्र.2 ची शेतजमीन फकिरा वेडू जाधव आणि गिरीधर खंडू जाधव यांची होती गिरधर खंडू जाधव मृत असून देखील त्यांचं जनरल मुखत्यार तयार करून त्यांचा वारस असल्याचं दाखवत खोटे दस्तऐवज तयार करून प्रभाकर सुधाकर जाधव,।संजय सुधाकर जाधव यांनी आपले नावे करून घेतली.
या विरोधात मंगलदास सदाशिव जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल केले आरोपींनी या विरोधात अंतरिम जामीन मिळवला होता आणि दाखल गुन्हा रद्द करण्याबाबत औरंगाबाद खडपीठ मुंबई उच्च न्यायालयात दावा क्र.2804/2019 दाखल केला होता. न्यायालयात दि.16/1/2020 रोजी यावर सुनावणी झाली.आरोपी पक्षातर्फे आर.आर. मंत्री आणि आर.आर.संचेती यांनी युक्तिवाद केला.तर फिर्यादी पक्षातर्फे व्ही.एन. पाटील आणि व्ही.डी.साळूखे यांनी प्रभावी युक्तिवाद केल्यावर न्यायमूर्ती व्ही.टी.नलावडे व एम.जे.शेवलीकर यांनी पोलिसात दाखल गुन्हा रद्द करण्याचा दावा फेटाळून लावत आरोपिंना तात्पुरता दिलेल्या दिलासा देखील रद्द केला आहे.






