Maharashtra

चांपा येथे केंद्रीय भूमीजल विभागामार्फत दोनशे मीटर बोअरवेलचे उदघाटन

चांपा येथे केंद्रीय भूमीजल विभागामार्फत दोनशे मीटर  बोअरवेलचे उदघाटन

चांपा येथे केंद्रीय भूमीजल विभागामार्फत दोनशे मीटर बोअरवेलचे उदघाटन

सरपंचाच्या पाठपुराव्यामुळे गावात पाणी टंचाईवर मात करण्याकरिता केंद्रीय भूजल विभागामार्फत दोनशे मीटर बोअरवेलचे उदघाटन .
चांपा ता .२५:चांपा ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय भूमीजल बोर्ड जलशक्ती मंत्रालय भारत सरकार प्रभाग नागपुर यांच्या सौजन्याने चांपा गावात दोनशे मीटर बोअरवेलचे उदघाटन पार पडले .चांपा गावाची पिण्याच्या पाण्याची समस्याचे निराकरण करण्याकरिता सरपंच अतिश पवार यांच्या पाठपुराव्याने  वेळोवळी केंद्रीय भूजल विभागात पत्रव्यवहार केल्याने सरपंच अतिश पवार यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले . चांपा गावाला पाणी टंचाई मुक्त गाव बनवण्याचा संकल्पनेतुन आज चांपा ग्रामपंचायत च्या आवारात  केंद्रीय भूमीजल विभागामार्फत साडेसहाशे फूट , व साडेसात इंच बोअरवेल केल्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई काळात पिण्यासाठी बोअरवेल करुन अति खोलीवरील संचित भूजल बँकेच्या फिक्स डिपॉझिट सारखे वापरता येईल. ग्रामपंचायत अनधिसूचित क्षेत्रात भूजल नियोजनाची जबाबदारी पार पाडणार असल्याने भूजल बँकेची संकल्पना रुढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला योग्य दिशा मिळेल. भूजल गुणवत्तेची समस्या कमी देखील करण्यात यश मिळणार आहे.
भूजल ही सामुदायिक संपत्ती असून लोकसहभागातून त्याचा विकास व व्यवस्थापनाची भावना दृढ होऊन पेयजल समस्येचे निराकरण करणे गांव पातळीवर शक्य होणार आहे. गांव पातळीवर पाऊस मोजणे, पाणी पातळी मोजणे, पाण्याचा ताळेबंद लावणे व त्या आधारावर दरवर्षी भूजल वापर योजना व पीक योजना कार्यान्वीत करणे शक्य होणार आहे. तसेच पाणी टंचाई वर प्रभावीपणे मात करता यावी यासाठी गांवपातळीवर पडलेल्या पावसाच्या आधारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्णय घेणे व त्यावर अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. 
केंद्रीय भूमीजल बोर्ड जलशक्ती मंत्रालय भारत सरकार प्रभाग नागपुर यांच्या सौजन्याने चांपा गावात आज दोनशे मीटर बोअरवेलचे उदघाटन सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय भूमीजल चे डीलर युनिट ईचार्ज के .एस. शर्मा , प्रदीप उंबरहंडे , मनोज शर्मा , व ग्रामपंचायतचे उपसरपंच अर्चना सिरसाम ,सदस्य अश्मिता अरतपायरे , मिरा मसराम , वामन भोयर , सूरज माहूरे , राजू नेवारे , प्रभाकर खाटिक , संजय पवार आदीच्या प्रमुख उपस्थितीत बोअरवेलचे उदघाटन झाले ..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button