Amalner

Amalner: महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील आदर्श सेविका म्हणून पुरस्कृत…

Amalner: महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील आदर्श सेविका म्हणून पुरस्कृत…

अमळनेर दि 1/9/2023 रोजी महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद जळगांव यांनी आज जिल्हा नियोजन समिती कार्यालय जळगांव येथे जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमास
अध्यक्षस्थानी म. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू भापसे हे होते. प्रास्ताविक म. जिल्हा प्रकल्प अधिकारी राऊत साहेब यांनी केले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक उत्कृष्ट कार्य करणारी अंगणवाडी सेविका यांना हा जिल्हा आदर्श पुरस्कार दिला जातो.

या वर्षात अमळनेर तालुक्यातून श्रीमती प्रमिला उत्तम पाटील जागृती अंगणवाडी सेविका रामेश्वर खुर्द यांना म. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. व्यासपीठावर अंकित पन्नू,जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि. प. जळगांव, जिल्हा आरोग्य अधिकार री, डाएटचे प्राचार्य झोपे तसेच तालुक्यातील सर्व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी क्षेत्रात 0 ते 6 वर्ष वयातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी
मुली यांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन करणे, आकार कार्यक्रम घेणे, निपुण
चाचणी,अंगणवाडी सजावट, 3 ते 6 वर्षातील बालकांना शालेय पूर्ण शिक्षण देणे,बालकांचा शारीरिक व बौध्दीक विकास करणे, नीटनेटके रहाणे, सुसंस्कारित करणे,कुपोषण रोखणे,सुपोषण करणे, बेटी बचाओ बेटी पढाओ, शासनाकडून आलेल्या सर्व परिपत्रकांची तसेच वरीष्ठ अधिकारी याच्या सूचनांची अंबलबजावणी करणे, सर्व दप्तर आद्ययावत ठेवणे,आपले कार्यक्षेत्र हेच तीर्थक्षेत्र हेच कुटुंब समजून सदृढ निकोप आणि सक्षम समाज निर्मीतीसाठी सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत या सर्व बाबी प्रभावीपणे काम नव्हे तर कर्तव्य करणाऱ्या सेविकेस हा पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते.सूत्रसंचलन श्रीमती अनिता मूगल यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती दमयंती इंगळे यांनी केले. अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील यांचे अभिनंदन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आबासाहेब गोकूळ पाटील यांनी केले असून तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button