Nashik

‘मलाही मुलगी आहे, म्हणूनच…’- मुलांना उद्देशून काय म्हणाले आ. सत्यजीत तांबे?

‘मलाही मुलगी आहे, म्हणूनच…’- मुलांना उद्देशून काय म्हणाले आ. सत्यजीत तांबे?

प्रतिनिधी
रिल्स, फेसबुक लाईव्ह अशा तरुणांना आपल्याशा वाटणाऱ्या माध्यमातून आ. सत्यजीत तांबे नेहमीच त्यांच्याशी संवाद साधत असतात. या रिल्समधून ते आपल्या मनातल्या भावना अगदी दिलखुलासपणे मांडताना दिसतात. नेमक्या याच कारणामुळे तरुणांनाही ते आपलेसे वाटतात आणि त्यांच्या या रिल्सला चांगला प्रतिसाद मिळतो. आ. तांबे यांच्या एका पोस्टने सध्या असंच लक्ष वेघून घेतलं आहे. या व्हीडिओत ते तरुणांना अगदी आत्मियतेने एक सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे हा सल्ला लग्न आणि करिअर अशा दोन्ही गोष्टींबाबत आहे.

सध्या लग्नासाठी मुलींना मुलांकडून प्रचंड अपेक्षा असल्याचं बोललं जातं. आ. तांबे म्हणतात की, कोणत्याही मुलीचा बाप हा मुलगा पाहताना तो किती कर्तृत्त्ववान आहे, हे पाहतो. मलाही मुलगी आहे. पुढेमागे ती जेव्हा तिचा जोडीदार निवडेल, तेव्हा मीदेखील तो मुलगा माझ्या मुलीची काळजी घेऊ शकेल ना, तो कर्तृत्त्ववान आहे ना, याच गोष्टींकडे लक्ष देईन. आपल्या मुलीचा उल्लेख करताना हळूवार झालेला हा लोकप्रतिनिधी आपल्यातलाच कोणीतरी एक आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आ. तांबे पुढे म्हणतात की, साधारणपणे मुलगी बघताना ती किती सुंदर आहे, हे बघितलं जातं. तर मुलगा किती कर्तृत्त्ववान आहे, हे पाहिलं जातं. खरं तर हे बदललं पाहिजे. पण सध्या ही परिस्थिती आहे. त्यामुळे मुलांनी कर्तृत्व सिद्ध करावं, त्यांना आयुष्यात हवी ती मुलगी मिळेल. अयोग्य मार्गांनी मुलींना गळ घालण्यापेक्षा कर्तृत्वाने त्यांच्या डोळ्यात भरा, हा सल्लाच ते तरुणांना देतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button