Akaluj

अकलूज मध्ये मनसेच्या वतीने वाढीव वीजबिलाची होळी..

अकलूज मध्ये मनसेच्या वतीने वाढीव वीजबिलाची होळी..

तात्या पिसे अकलूज

Akluj : अकलूज येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यात वाढीव वीजबिल माफ करावे या मागणीसाठी वीजबिलाची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याच निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांच्या नेतृत्वाखाली वीजबिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले.व वीजबिल माफ करावे अशी मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने,विनोद सावंत,राहुल कुलकर्णी,स्वप्नील कदम,अजीम मुलाणी,संतोष गुळीक,दीपक एवळे,इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button