Amalner

Amalner:  मार्केट कमिटीत सहकार पॅनल चे निवडून आलेल्या उमेदवारांचा  काँग्रेस पक्षातर्फे सत्कारचे आयोजन…

Amalner: मार्केट कमिटीत सहकार पॅनल चे निवडून आलेल्या उमेदवारांचा काँग्रेस पक्षातर्फे सत्कारचे आयोजन…

आज दिनांक8 मे 2023 रोजी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत, महाविकास आघाडीतून निवडून आलेल्या उमेदवारांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम दुपारी1 वाजता, धनदाई माता एज्युकेशन संस्थेच्या हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अंमळनेरचे आमदार भूमिपुत्र श्री दादासाहेब अनिल पाटील होते. तर अध्यक्षपद जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप जी पवार यांनी भूषवले. तसेच जळगाव जिल्हा ओबीसी अध्यक्ष डी.डी. नाना पाटील हे देखील उपस्थित होते. दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर, महाविकास आघाडीत निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ. अनिल शिंदे, श्री भोजमल पाटील, श्री सुरेश पाटील, डॉ. अशोक पाटील, प्रा. सुभाष पाटील, श्री अशोक आधार पाटील, श्री भाईदास भील, सौ. पुष्पा विजय पाटील, श्री समाधान धनगर, श्री सचिन बाळू पाटील यांचा पराभुत उमेदवार व हजर असलेल्या मान्यवरांच्या हस्ते, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सांत्वना प्रित्यर्थ निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, श्री सुरेश विक्रम पाटील, श्री गोकुळ आबा बोरसे, श्री दीपक पाटील व श्री रामकृष्ण पाटील यांचा सत्कार माननीय आमदार अनिल दादा पाटील व जिल्हाध्यक्ष प्रदीप जी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर ज्यांना निवडणूक लढण्याची संधी नाकारली गेली, किंवा तिकीट कापले गेले ते श्री भागवत केशव सूर्यवंशी व श्री प्रताप नगराज पाटील यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संदीप घोरपडे यांनी केले. त्यात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे यांचा निसटता पराभव झाला थोडक्यात गड आला पण सिंह गेला कांग्रेसचा अगोदर स्वबळावर लढण्याचा मानस होता, हे त्यांनी नमूद केले. व कोणत्याही निवडणुकीत प्रचारासाठी काँग्रेस चीच मंडळी अग्रेसर असते व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेसला मोठा भाऊ मानतात, त्यानुसार माननीय दादांनी देखील काँग्रेसलाच मार्केट सभापती प द द्यावे अशी विनंती केली.
त्यानंतर मा आमदार श्री अनिल दादांनी सभा संबोधन करताना, निवडून आलेल्या उमेदवारांनी, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आले त्यांची सदैव जाणीव असू द्यावी. व निवडणुकीत सकारात्मकतेला महत्त्व असते. अपप्रचार करणाऱ्यांचे मतदार ऐकत नाहीत. ते जनमानसात बदनाम होतात. तसेच माझ्यासोबत श्री प्रदीप पवार श्री विष्णू भंगाळे अशी समजूत दार मंडळी असल्यामुळे अमळनेर मार्केट कमिटीच्या पॅनलला गालबोट लागली नाही व पंधरापैकी 11 उमेदवार निवडून आले. आगामी निवडणुकात देखील अशीच महाविकास आघाडी राहील. अमळनेर अर्बन बँकेच्या निवडणूकीत आपले श्री संभाजी लोटन पाटील, मुन्ना भाऊ शर्मा, प्रवीण जैन, आणि सोमचंद संदांशिव हे उभे राहत आहेत. त्यांना सहकार्य करावे अशी विनंती केली. असे सकारात्मक विचार अनिल दादांनी मांडले.
तर अध्यक्षिय भाषणात, श्री बाळासाहेब प्रदीप पवार यांनी, आमदार साहेबांचे आभार मानले. कारण जागांच्या वाटाघाटीत, उमेदवार देताना, काँग्रेसचा सन्मान राखला गेला. म्हणून महाविकास आघाडीला मोठे यश आले. तसेच अमळनेर सारखी महाविकास आघाडी संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत झाली पाहिजे व प्रत्येक तालुक्यात अंमळनेर सारखे सहकार्य मिळाले, तर सर्व निवडणुकात महाविकास आघाडीच अग्रेसर राहील. तसेच निवडणूक काळात अपप्रचार करणे, आपलाच उमेदवार पाडणे असे करणाऱ्यांना इसापनीतीतल्या गोष्टींचा आधार घेऊन, पक्षाचे व स्वतःचे कसे नुकसान होते, हे अध्यक्ष साहेबांनी अभ्यासपूर्ण पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष श्री मनोज बापू पाटील यांनी केले. कार्यक्रमात सर्व महाविकास आघाडीचे मार्केट कमिटीचे उमेदवारांची उपस्थिती होती.तसेच रावसाहेब के. डी. पाटील, श्री बाळाप्पा, रोहिदास दाजी, श्रीराम आप्पा, मुन्ना शर्मा, तुषार संदंशिव,प्रवीण जैन, कन्हयालाल कापडे, निळकंठ तात्या, सोमचंद संधान शिव, जुबेर पठाण, सय्यद तेली, सलीम कुरेशी, अमजद पठाण, प्रमोद पाटील, आदी कार्यकर्ते हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button