विविध उपक्रमांनी “उमंग” मॅरेथॉन स्पर्धा गाजली
शेकडो मुली महिलांच्या सहभागाने शहर दणाणले : मान्यवरांच्या मार्गदर्शनाने महिला सुखावल्या
मनोज भोसले
चाळीसगाव – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खासदार उन्मेश दादा पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने आज सकाळी साडे पाच वाजता राष्ट्रीय महाविद्यालयाच्या प्रांगणातुन नाशिक महिला मॅरेथॉनच्या संस्थापिका सोनाली दबक तसेच उद्योजिका डॉ कविता बोंडे यांच्या उपस्थितीत महिला मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली.यावेळी पोद्दार शाळेच्या प्राचार्या लता उपाध्याय,समारोप प्रसंगी स्त्री शक्ती जागर कार्यक्रमात लघु उद्योगातून हजारो महिलांना आर्थिक स्वयंपूर्णतेचा राजमार्ग दाखविणाऱ्या प्रशिक्षक कविता बोंडे, तसेच शेकडो महिला मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देणारे आंतरराष्ट्रीय कराटेपटू फिरोज खान हे महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्या महिलांना धावता, पळता येत नसेल तरी अशा मुली माता भगिनींनी यात सहभाग नोंदवावा. सहभागी महिलांना असे आवाहन उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील केले आहे
गेल्या दहा वर्षापासून उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने महिलाना आत्मनिर्भर करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
येत्या रविवारी सकाळी साडे पाच वाजता “चला आत्मबळासाठी धावू या” तसेच “स्त्री शक्तीत नवी उमंग जागवूया” या उपक्रमात महिला मॅरेथॉन व स्त्री शक्ती जागर कार्यक्रम होणार असून यात शिंपी समाज महिला मंडळ, लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ, मारवाडी समाज महिला मंडळ, ब्राम्हण समाज महिला मंडळ, राणी पद्मावती राजपूत महिला मंडळ, संस्कार भारती ,वसुंधरा फाउंडेशन ,आई फाउंडेशन,इनरव्हील क्लब ऑफ मिल्कसिटी,रंगगंध कला सक्त न्यास तसेच रोटरी क्लब या सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाची राष्ट्रीय महाविद्यालयाच्या प्रांगणावर जय्यत तयारी सुरू असून शहरातील विविध भागात फलक लावून जनजागृती करण्यात आली आहे. मॅरेथॉन स्पर्धा राष्ट्रीय महाविद्यालय येथून सुरू होणार असून सिग्नल पॉइण्ट लकी बूट हाऊस समोरील गणेश क्रॉस रोड बस स्थानक रोड तेथून पुन्हा सिग्नल चौकातून राष्ट्रीय महाविद्यालय येथे समारोप होणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि पिवळा पोशाख परिधान करून महिलांनी सहभागी व्हावे.सहभागी महिलांना पन्नास टक्के सवलतीत जि वाय एम फिटनेस क्लबची मेंबरशीप देण्यात येणार आहे. तर विजेत्यांस एका वर्षाची मेंबरशीप बहाल करण्यात येणार आहे तसेच गिफ्ट हॅपर ,मेडल देण्यात येतील कार्यक्रमासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि पिवळा पोशाख परिधान करून महिलांनी सहभागी व्हावे
असे आवाहन उमंग तर्फे करण्यात आले आहे.
तज्ञ प्रशिक्षकांचा सहभाग
उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेसाठी नाशिक वूमेन्स वॉकेथॉनच्या फाउंडर आणि रनर सोनाली दबक उपस्थित राहणार असून सोनाली ताईंनी 2017 साली नाशिक येथे वूमेन्स वाकेथॉनचे यशस्वी आयोजन केले आहे. तसेच वॉक फॉर लाईफ, आद्या नवरात्री वॉक,मुन लाईफ वॉक,मड मॅनिया, ढोल प्रशिक्षण वर्ग असे विविध उपक्रमातून त्यांनी महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.आज उमंग समाजशिल्पी महिला परिवार आयोजित महिला मॅरेथॉन व स्त्री शक्ती जागर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे कविता ताई बोंडे या देखील महिलांच्या भेटीला येत असून
त्यांनी हजारो महिलांना लघु उद्योगातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. संवेदनशील मनाच्या कविताताईंनी गल्ली ते दिल्ली तील महिलांना विविध व्यवसायातुन आर्थिक स्वयंपूर्ण केले एवढेच नव्हे तर साता समुद्रापार महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.देशातील सर्वात मोठा मधुमक्षिका पालन क्लस्टर ची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि त्यांचा गौरव केला आहे. १२०० महिलांना एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कविता ताई आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आर्थिक स्वावलंबी होण्याचा मूलमंत्र ऐकून घेऊ या असे आवाहन करण्यात आले आहे .याच कार्यक्रमात
आंतरराष्ट्रीय दर्जाचे कराटे प्रशिक्षण देणारे फिरोज खान हे देखील स्त्री शक्ती जागर कार्यक्रमात महिलांना आत्म संरक्षणाचे धडे देणार आहेत. फिरोज खान हे आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट (सेन्साई मास्टर खान)
त्यांनी मार्शल आर्ट,4 था डॅन आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट तसेच अध्यक्ष – कुओ शु कुंग फू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र म्हणून काम पाहिले आहे .चाळीसगाव आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मुला मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहे. अलीकडेच चाळीसगाव येथे मास्टर फिरोज खान सर यांच्या अंतर्गत मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत असलेले 160 विद्यार्थी. त्यांनी मुलींसाठी मार्शल आर्ट आणि महिला सबलीकरणाच्या मदतीने मुलींना आत्मरक्षासाठी प्रशिक्षण देण्याची चळवळ त्यांनी सुरू ठेवली आहे.






