Sangali

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सांगली राहुल खरात

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त प्रगती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व संजीवनी महा- ई सेवा केंद्र यांच्या संयुक्तविधमाने न्यु रेल्वे स्टेशन जवळ जेष्ठ नागरिक एस् टी महामंडळ स्मार्ट नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते.शिबिराचे प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते मा.कैलास मुळके व मा.विकास शिंदे यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालणेत आला.यावेळी प्रगती बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.संजय (भाऊ) कांबळे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवनकार्य व स्त्री शिक्षणासाठी केलेली चळवळ याविषयी मत मांडले उपस्थितांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ.निर्मला मोरे, सौ.आशा गडचे,अभिजीत शेस्वरे यांच्यासह जेष्ठ नागरिक व भागातील महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button