Celebration Of The Year “Avishkar – 2019-2020”हरी ओम पब्लीक स्कूल दहिवद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. दादासो मंगेश जी चव्हाण (आमदार चाळीसगाव) यांची उपस्थिती लाभली तर शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नानासाहेब भिमराव खलाणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तात्यासाहेब पांडुरंग वाघ, दहिवदचे सरपंच भिमराव पवार,दहिवदचे पोलिस पाटील विश्वास वाघ,प्रा.सुनिल निकम सर(तालुकाध्यक्ष,भाजपा),दादासो.एकनाथ हरी खलाणे, आबासो.सुधाकर वाघ,आबासो.चिंधा पंडित वाघ,पियुष साळुंखे(पं.स.सदस्य,मेहुणबारे) हिंमत दादा निकम,विजय खलाणे,प्रशांत खलाणे, पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच अनेक पदस्थ व सर्व पालकांनी* या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून झाली.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चेतना आशिष खलाणे, हरी ओम किसान सेवा केंद्राचे डिलर श्री.आशिष खलाणे, श्री.योगेश वाघ,सौ.छाया योगेश वाघ श्री.भूषण खलाणे, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली असून कार्यक्रमाची सांगता श्री.भिमराव खलाणे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.






