ओझर येथे मारुती व भवानी मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी नितिन माळे
ओझर गावातुन जाणाऱ्या जळगाव -चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील पुरातन मारुती व भवानी मंदिर रस्ता सुशोभीकरण कामात येत असल्याने ग्रामस्थांच्या मागणी नुसार महामार्ग प्राधिकरणातर्फे गाव चावडी याठिकाणी नवीन मारुती व भवानी मंदिर बांधकाम करून देण्यात येत आहे.
या दोन्ही मंदिर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, सरपंच सौ.वणाबाई साहेबराव गायकवाड, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण ,तालुका उपाध्यक्ष दिनकर पाटील, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, उपसरपंच कमलाकर गुजर, आर.जी.बापू पाटील, माजी पोलीस पाटील वाल्मिक पाटील, पोलीस पाटील नामदेव पाटील, मार्तंडराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद जाधव, रावसाहेब पाटील, संतोष गुजर, मोहन गुजर, प्रवीण पाटील, शांताराम अप्पा पाटील, नामदेव नेरपगार, नाना टेलर, लक्ष्मण नाना झोडगे, धोंडू कोळी, पांडुरंग शार्दूल, प्रभाकर गायकवाड, ओंकार गायकवाड, दीपक पाटील, ठेकेदार युवराज गुजर, धर्मराज गुजर, महादू गुजर, पोपट शिंदे, शामभाऊ पाटील, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.






