Indapur

इंदापूर मध्ये एकाच्या हातावर बसला होम काॅरन्टाईन;चौदा दिवस राहणार विलगीकरण कक्षात.

इंदापूर मध्ये एकाच्या हातावर बसला होम काॅरन्टाईन;चौदा दिवस राहणार विलगीकरण कक्षात.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : नुकतेच मलेशिया हून भारतात परतलेल्या एका कुटुंबातील महीला सदस्याला होम काॅरन्टाईन टॅगिंग करण्यात आलेय. कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा वेगळी लक्षणे जाणवल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याच्या व चौदा दिवस विलगिकरण कक्षात राहण्याच्या सूचना देखील आरोग्य पथकाने केल्या आहेत.

सध्या 109 हुन अधिक देशांवर कोरोना या विषाणुजन्य रोगाचे सावट आहे. सर्वात जास्त रुग्ण पुण्यात असून खबरदारी साठी राज्य सरकारने आपली पावले अधिक गतिमान केली आहेत. इतर देशातून भारतात परतलेल्या नागरिकांची कसून चौकशी देखील करण्यात येतेय. शिवाय त्यांच्या आरोग्याची देखील सखोल तपासणी केली जातेय.

7 मार्च ला मलेशिया येथून चार व्यक्तींचे एक कुटुंब पुण्यात दाखल झाले मात्र त्यांपैकी 3 व्यक्ती या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका मुळ गावी परतल्या. तर त्यांसोबत असणारी एक महीला 7 मार्च पासून पुण्यातील हडपसर येथे आपल्या निवासस्थानी थांबली. नंतर 17 मार्च ला ती सुद्धा या ठिकाणी आपल्या कुटुंबीयांत दाखल झाली. सध्या या कुटुंबातील सर्व लोक ठणठणीत असून त्यांना कोणताही त्रास नसल्याचे या कुटूंबातील व्यक्तींनी सांगितले आहे. मात्र खबरदारी म्हणून 17 मार्च रोजी कुटुंबात दाखल झालेल्या एका महीला सदस्याच्या हातावर HOME QUARANTINE शिक्का मोर्तब करण्यात आला असून सदर व्यक्तीला घरामध्येच 14 दिवस आयसोलेशन रुम मध्ये ठेवण्याच्या सुचाना देण्यात आलेत.यावेळी वैद्यकिय अधिकारी डाॅ.मिलिंद यादव, डाॅ. एकनाथ चंदनशिवे,इंदापूर पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनिल वाबळे, आरोग्य सहाय्यक गणेश मोरे,दिपक उत्तेकर,नागनाथ खराडे,सरपंच रविंद्र पाटील,पोलिस पाटील, शैलजा पाटील, ग्रामसेवक स्वाती लोंढे आदी मंडळी उपस्थित होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button