Chalisgaon

चाळीसगाव वासीयांसाठी अभिमानाची बातमी…

चाळीसगाव वासीयांसाठी अभिमानाची बातमी…

जळगाव जिल्ह्याच्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार मंगेश चव्हाण यांची निवड

दि.१६ ते १९ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

मनोज भोसले

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आपले लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे,
खऱ्या अर्थाने ही समस्त चाळीसगाव वासीयांच्यासाठी अभिमानाची बाब आहे,
चाळीसगाव तालुक्याला प्रथमच हा बहुमान मिळत असून या अगोदर माजी मंत्री गिरीश महाजन, एकनाथरावजी खडसे, जैन उद्योग समूहाचे अशोकजी जैन यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी हे अध्यक्षपद भूषविले आहे.

शिवजयंती च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे ते पुढीलप्रमाणे

दि.१६ फेब्रुवारी २०२० –
सायं. ४ वाजता
स्थळ – काव्यरत्नावली चौक येथून मोटार सायकल रॅली (पुरुष)

दि.१७ फेब्रुवारी २०२० –
सायं ४ वाजता
स्थळ – काव्यरत्नावली चौक, येथून मोटार सायकल रॅली (जिजाऊ ब्रिगेड)

दि.१८ फेब्रुवारी २०२०
सकाळी १० वाजता
स्थळ – आकाशवाणी चौक येथे वृक्षारोपण

दि.१९ फेब्रुवारी २०२०
सकाळी ९ वाजता
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथून भव्य मिरवणूक

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button