Satara

?प्रेरणादायी…साथ प्रतिष्ठान वतीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्षांसाठी खाद्य व पानवठे बांधून नैसर्गिक रंगाची उधळण करीत केली रंगपंचमी साजरी…

?प्रेरणादायी

साथ प्रतिष्ठान वतीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्षांसाठी खाद्य व पानवठे बांधून नैसर्गिक रंगाची उधळण करीत केली रंगपंचमी साजरी…

दिलीप वाघमारे

सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांनी जशी रखरखीत दुष्काळ परिस्थिती अनुभवली आहे तशीच पुरस्थिती वेळी ओला दुष्काळ सुद्धा अनुभवला आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अतिवापर अथवा अपव्यय टाळणे गरजेचे आहे, आपण पाहतो कि उन्हाळा तापायला लागला की अनेक भागातील नागरिकांप्रमाणेच पशुपक्षी देखील पाण्यासाठी वणवण भटकत असताना दिसतात, मनुष्य आपली तहान अनेक प्रकारच्या माध्यमातून भागवु शकतो परंतु पशुपक्षांसाठी पाण्याची ठिकाणे शोधण्यासाठी स्थलांतर होण्याशिवाय पर्यायच नसतो व याकारणे अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागल्याचे चित्र दिसते एरवी नजरेस दिसणारे अनेक पशु पक्षी नामशेष होऊन दुर्मिळ होऊ लागले आहेत, यामुळे आजच्या पिढीला चित्रांतूनच अनेक पशुपक्षी दाखवावे लागत आहेत.

पक्षी आपल्या वाणीतुन सुर्योदय असो नाहितर ऋतूंमधील आपल्याला संदेश देत असतात अशा रंगबेरंगी पशुपक्षांची उपस्थिती तसेच किलबिल निसर्गाचे सौंदर्य वाढवते त्यांस ऐन उन्हाळ्यात आवश्यकते प्रमाणात तहान भागविण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले तर निसर्गाचा समतोल बिघडला जाईन याकारणे हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्षांसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचा अपव्यय टाळत नैसर्गिक रंगाची उधळण करत व पशुपक्षांसाठी विविध ठिकाणी व वृक्षांवर पानवठे व पशुखाद्य भांडी उभारणी करत साथ प्रतिष्ठानचे वतीने रंगपंचमी हा आनंदोत्सव साजरा केला.
हा उपक्रम यशस्वीते साठी साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, मंगेश माने, दिपक बाटे, किरण खरात, अजित घोलप, दिपक जाधव, संतोष क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button