Chalisgaon

शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगावात मोफत नेत्रतपासणी शिबिर

शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगावात मोफत नेत्रतपासणी शिबिर

मनोज भोसले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून चाळीसगांव मारवाडी युवा मंच चाळीसगाव शिवसेना तालुका व शहर शाखेच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येऊन या शिबिरात जवळपास २७० नेत्र रुग्णांनी सहभाग घेऊन आपले डोळे तपासून घेतले तर १५ रुग्ण आॅपरेशन साठी मालेगाव येथे रवाना झाले यासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव संलग्न रोटरी चारिटी ट्रस्ट संचलित बी. एस. भंडारी रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव कॅम्प व मारवाडी युवा मंच चाळीसगाव यांनी संपूर्ण सहकार्य करून आपल्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत रुग्णांची तपासणी केली यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम मामा कोळी गोपाल भाऊ दायमा उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे संघटक सुनील गायकवाड युवा सेनेचे प्रशांत कुमावत माजी तालुकाप्रमुख धर्मा काळे माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर नगरसेवक रोशन जाधव संजय ठाकरे जगदीश महाजन उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील हिम्मत निकम अनिल पाटील सचिन ठाकरे शैलेंद्र सातपुते नकुल पाटील सागर पाटील वर्धमान धाडीवाल दिनेश घोरपडे विकास राठोड रवींद्र चौधरी अमोल चौधरी वासुदेव पाटील उपस्थित होते शिबिरात डॉक्टर योगेश मार्तंड डॉक्टर पांडुरंग पाटील अभय साळुंके योगेश साळुंखे सागर परदेशी सुरेश पवार यांनी रुग्णांना तपासून योग्य त्या सूचना दिल्या तर मारवाडी युवा मंचचे समकित छाजेड संजय अग्रवात पंकज दायमा यांनी मोलाचे सहकार्य केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button