अहमदनगर

आखाडा विधानसभेचा भातकुडगाव फाटा येथे जनसंपर्क अभियान संपन्न….

आखाडा विधानसभेचा
भातकुडगाव फाटा येथे जनसंपर्क अभियान संपन्न….

आखाडा विधानसभेचा भातकुडगाव फाटा येथे जनसंपर्क अभियान संपन्न....

अहमदनगर प्रतिनिधी सुनील नजन
जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथील वरदराज लाँन्स मंगलकार्यालयात जनशक्ती विकास आघाडीचे जनसंपर्क अभियान संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक अर्जुन काळे हे होते. प्रारंभी प्रास्ताविक दिगंबर नजन यांनी केले. अशोक आहेर,एकनाथ काळे,नामदेव नजन,जगन्नाथ गावडे,जनार्दन वाबळे,अजय नजन,नितीन जाधव,शंकर देवढे,अँड शिवाजी राव काकडे,विद्यमान जि.प.सदस्य सौ हर्षदाताई काकडे यांची भाषणे झाली. त्यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सामांन्य जनतेच्या प्रलंबित प्रश्नापैकी पिण्याच्या पाण्याच्या अर्धवट रहिलेल्या ताजनापुर योजनेचा कसा बोजवारा उडाला हे सविस्तर सांगितले.आता मात्र सामांन्य जनतेच्या प्रश्नासाठी शेवगावचाच आमदार झाला पाहिजे अशी मागणी केली.

आखाडा विधानसभेचा भातकुडगाव फाटा येथे जनसंपर्क अभियान संपन्न....

यावेळी अशोक दातिर, मधुकर फटांगरे, पोपट लोखंडे,मोहन विघ्ने,रामनाथ धुमाळ, आदिनाथ उकिर्डे,दत्तु भवार,खंडु चिकणे,संतोष खरड,दादासाहेब म्हस्के, बबन सौदागर, किसन खंदारे, गणेश आहेर,आबा राऊत,भारत भालेराव यांच्यासह भातकुडगाव गटातील असंख्य  कार्यकर्ते उपस्थित होते.आभार दिगंबर थोरात यांनी मानले. युवा नेते अजय नजन यांनी राष्ट्रवादी ला रामराम करून सौ हर्षदाताई काकडे यांना विधानसभा निवडणुकीत काही अटीवर पाठिंबा जाहीर केला आहे.       

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button