?️ कोरोना अपडेट..चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे कोरोना पॉझिटिव्ह
चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
शहरातील एका खासगी दवाखान्यात गेल्या दोन दिवसांपासून उपचार घेणार आमोदे ता नांदगाव येथील तरुण रुग्ण कोरोना पोसिटीव्ह निघाल्याची माहिती डॉक्टर बी पी बाविस्कर यांनी दिली आहे यामुळे चाळीसगाव प्रशासन हादरले असून दवाखान्यात सील करणे प्रकिया सुरु आहे.
आमोदे ता नांदगाव येथील रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून चाळीसगाव येथील भडगाव रोड स्थित एक खाजगी दवाखान्यात उपचार घेत होता त्याला कोरोना सदृश लक्षणें आढळल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले
त्या ठिकाणी त्याची स्वाब घेऊन तपासणी केली असता तो कोरोना पॉझीटीव्ह निघाला दोन दिवसांपासून तो शहरातील रुग्णालयात दाखल असल्याने रुग्णालयात त्याचा अनेकांशी संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नाही






