Pandharpur

राजकीय झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची वापर न करण्याचा इशारा

राजकीय झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची वापर न करण्याचा इशारा

प्रतिनिधी रफिक आत्तार

राजकीय झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा वापर न वापरणाचा इशारा शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचा इशारा राजकीय झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा वापरण्यास शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचा विरोध आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम बाराबलूतेदार आणि शिवप्रेमींचा विरोध आहे.

त्यामुळे मी आपणास निवेदनाव्दारे मागणी पंढरपूर नायब तहसीलदार बुचके साहेब यांना देण्यात आले. राज ठाकरे साहेब महाराष्ट्र आहे. तर संपूर्ण देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. संपूर्ण समाजामध्ये त्यांना पूजनीय मानणारा वर्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं जीवन लोककल्याणासाठी खर्च केल आहे. त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाराबलूतेदारांच्या हितासाठी राजमुद्रेची स्थापना केली होती.आज तुम्ही स्वताचा फायदासाठी राजमुद्रेचा वापर करू नये.

पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच राजमुद्रेचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी व आपल्या समाजामध्ये एक फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. याला संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून विरोध होत आहे ही बाब भविष्यासाठी खूप खतरनाक होणार आहे. यावर आपण पूर्णपणे अपेक्ष घेऊन हा राजकीय स्वार्थी डाव हाणून पाडावा ही आपणास नम्र विनंती भविष्यात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटल या सर्व गोष्टीला जबाबदार सर्व प्रसशान व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राहातील.पुढील सर्व गोष्टींचा विचार प्रसशानाने करावा.आणि राजकीय झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरण्यास परवानगी देवू नये.अशा इशारा शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आहे. यावेळी नायब तहसीलदार बुचके यांना निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,मोहन अनपट,मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय रामभाऊ गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप मांडवे, संभाजी बिग्रेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम, संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष हनुमंत बागल,राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत शिंदे,संतोष बंडगर,विजय काळे,विकी भोसले,आकाश मांडवे, आकाश पवार, आनंद कतले सर,शहाजी शिंदे, किरण शिंदे, रविराज मुटकुळे, अजय गुंड,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button