Sakri

मदत…गरजवंत आदिवासींसाठी” या उपक्रमांतर्गत गरजू आदिवासींच्या कुटुंबांसाठी रेशन किटचे वाटप

मदत…गरजवंत आदिवासींसाठी”
या उपक्रमांतर्गत गरजू आदिवासींच्या कुटुंबांसाठी रेशन किटचे वाटप

आज दिनांक:- १२ जून २०२० रोजी जामखेल ता. साक्री जि. धुळे येथे “Tribal Athari Foundation, Nanded (India)” च्या वतीने “‘मदत…गरजवंत आदिवासींसाठी”*
या उपक्रमांतर्गत गरजू आदिवासींच्या कुटुंबांसाठी रेशन किटचे वाटप करण्यात आले*

आदिवासी बहुल दर्‍याखोर्‍यात , वाडा, वस्ती, पाडा आणि खेडा अशा भागात ऊन,वार‍ा ,पाऊस यांच्यासारख्या संकटाना तोंड देत आपले जीवन जगत असतात. खरंतर आपण स्वत: पोटभर जेवण करायचं असतं हे ही नक्की माहित नसणार अशा कठीण प्रसंगाना सडेतोडथोड ” TRIBAL ATHARI FOUNADTION ,NANDED ,INDIA” च्या वतीने फुल ना फुलाची पाकळी तमाम गरजू आदिवासीं पर्यंत महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत‍ातल्या तळागाळातल्या ,दर्‍याखोर्‍यातल्या आदिवासींच्या मुखात घास पोहचण्याचं कार्य “TAF” या संस्थे मार्फत करणेत आले आहे. आणि याहीपुढे करत राहू.

आज अभिमान वाटतो की, आदिवासीांचा महान योध्दा , क्रांतिवीर ,क्रांतीसुर्य, महामानव ,धरती आबा , वीरपुरुष , बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिन यानिमित्ताने ३ जामखेल गावात आदिवासी विर योध्दा एकलव्य यांच्या फलका समोर व विर एकलव्य यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन जामखेल येथील कोकणी व भिल जातीतील गरीब ,निर‍ाधार , विधवा , वृद्ध अशा कुटुंबांना रेशन किट वाटप करुन आदिवासींच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला . श्री पवार सर यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन संस्था गोरगरीबांना कशी मदत करत आहे हे स्पष्टच केले त्याच बरोबर अनेक कर्मचारी या संस्थेला मदत करणेसाठी धावून आलेत येत आहेत.
पोलीस पाटील यांनी संस्थेचे भरपूर कौतुक केले. व असा प्रयोग साक्री तालुक्यात पवार सरांनी त्यांच्या अथारी संस्थेमार्फत चालवलेला उपक्रम अतिशय अभिमान बाळगण्या सारखेच आहे.

आजच्या पवित्रकार्यात जामखेल येथे आदिवासी प्राथमिक शिक्षक साहेबराव पवार तसेच आदरणीय पोलीस पाटील सुरेश चौधरी , आदरणीय सरपंच विश्वास थैल , दुकानदार संदिप ठाकरे व पवार सरांचे सहकुटुंबं, मोठे बंधूराज राजेंद्र पवार व गजमल पवार व आमचे वडील गंगाराम पवार तसेच आनंदा ठाकरे त्याचबरोबर आदिवासी एकलव्य संघटना जामखेल यां संघटनेचे अध्यक्ष राजाराम सोनवणे त्याचबरोबर विजय सोनवणे यांच्या अथक प्रयत्नातून आदिवासी कुटुंबीयांना रेशन किट वाटप करुन कोरोनाने चेहर्‍यांवरचे आनंद हरवून टाकले होते मात्र पुन्हा त्याच चेहर्‍यावर हर्ष आणण्याचा प्रयत्न केला. पवार परिवारांनी केलेले मोलाचे सहकार्ये प्रेरणादायी आहे.

सर्वांनी नियमाचे पालन करुन सर्व आदिवासी बांधव‍नी सहकार्य केले. खरंतर हा उपक्रम राबवतांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला . तांदुळ लवकर न भेटनं, लाॅकडाऊनमुळे गाव सीलबंद केल्यामुळे पांढर्‍या पिशव्या मिळाल्या नाहीत . मात्र त्यावर तोडगा काढून लाल पिशव्यांचा वापर करणेत आला. खरंतर लाल पिशवी आदिवासी समाजाशी निगडित आहे याचे कारण आमची फडकी लाल आहे म्हणूनच की काय पांढरी पिशव न मिळण्या मागचं कारण असावं.

Leave a Reply

Back to top button