Amalner

? Big Breaking.. देशातील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून पेपरबाजी करणारे आमदार अमळनेर शहरातील शेतकऱ्यांना न्याय देतील का..!

? Big Breaking.. देशातील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून पेपरबाजी करणारे आमदार अमळनेर शहरातील शेतकऱ्यांना न्याय देतील का..!

अमळनेर येथे अत्यन्त संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत गलवाडे रोडवरील शेतकऱ्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्ना साठी रस्त्यावर उतरून पेपरबाजी करणारे तालुक्याचे आमदार आमच्या प्रश्ना कडे लक्ष देतील का?आम्ही वेळोवेळी तक्रार करूनही आमची दखल घेण्यात आली नाही. आधी गावातील,तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा मग देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरा अशी तिखट प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात दिली आहे.आम्हाला शेवटी जिल्हाधिकारी आणि वरच्या पातळीवर न्याय मागावा लागला असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.याबद्दल ची माहिती अशी की अमळनेर ता.अमळनेर ढेकु रोड, पिंपळे रोड, गलवाडे रोड परिसरातील शेतकरी
शेती शिवारात येणाऱ्या मोकाट जनावरांवर व डुकरांच्या त्रासाला कंटाळले आहेत.ते आता जीवावर उदार झाले आहेत.यासंदर्भात वेळोवेळी शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे .सविस्तर माहिती अशी की अमळनेर
पश्चिमेकडील ढेकु रोड, पिंपळे रोड, गलवाडे रोड, धुळे रोड या पसिरा मधील मोकाट जनावरे व डकुरे शेतात येवून उभ्या पिकांचे नुकसान करतात. तसेच पाळीव जनावरांना देखील चारा
खान्यास अडथळा आणतात.याबाबत शेतकऱ्यांनी मा.मुख्याधिकारी साो., न.पा.अमळनेर यांना वारंवार अर्ज देवून देखील यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे आज सदर पाळीव प्राणी मालक यांनी
शेतकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर मोकात प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे फार मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
डुकरांची सद्याची परिस्थिती पहाता हे सर्व शेतकरी खुप अडचणीतुन जात आहे. यांच्यामुळे
होणारे नुकसान शेतकरी बांधवांवर उपासमारीची वेळ येत आहे.हे संकट नैसर्गिक नसुन मानव निर्मित आहे. तरी सदर जनावरांचा बदोबस्त करुन शेतकऱ्यांना न्याय दयावा.सदर मोकाट जनावरे व डुकर यांच्या मालकांवर कार्यवाही करुन शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान टाळावे.अशी मागणी केली आहे.सदर जनावारांचे मालक रात्री बे रात्री प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी जावून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करतात. सदर व्यक्ती दहशत निर्माण करून आम्हाला धमकी देवून गेले की, ज्यांच्या शेतात आमचे पाळीव ढुक्कर मेलेले आढळेल त्यांनी त्यांचा जिवाचा विचार करुन घ्यावा. सदर व्यक्ती शेताचे ४ ते ५ वर्षापासुन डुकरांमुळे नुकसान करीत असून बोलण्यास गेले असतां प्रत्येक शेतकऱ्याला जिवे मारण्याची धमकी देवून गेले आहेत.

यासंदर्भात पत्रव्यवहार मा.जिल्हाधिकारी साो., जळगांव मा.आमदार श्री.अनिलदादा पाटील साो., अमळनेर जि.जळगांव मा.उपविभागीय अधिकारी साो., अमळनेर जि.जळगांव मा.कार्यकारी दंडाधिकारी साो., अमळनेर जि.जळगांव मा.मुख्याधिकारी साो., अमळनेर नगरपरिषद, अमळनेर
मा.पोलीस निरीक्षक साो.. पोलीस स्टेशन, अमळनेर यांना शेतकऱ्यांनी केला आहे.या अनुषंगाने मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या कडे सदर तक्रार गेली असता त्यांनी तात्काळ दखल घेत दि 11 डिसेंबर 2020 रोजी मा उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी न पा, पोलीस निरीक्षक अमळनेर, आणि शेतकरी बांधव अशी बैठक चर्चे साठी आयोजित केली आहे. त्यामुळे उद्या ह्या विषयावर काय मार्ग निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणारआहे.

सदर निवेदनावर अधिकार उत्तम देसले, राजेंद्र उत्तम देसले,प्रकाश देसले,देविदास लक्ष्मण देसले
उमेला लांडगे,दिलीप देशमुख, आधार लांडगे,सुधाकर लाडगे,गणेश भिका लांडगे,
योगेश महादू लांडगे,अशोक ईश्वरलाल कोष्टी
भास्कर महादू पाटील ,नन्दलाल पाटील,उमेश सुधाकर लाडगे इ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button