क्राईम स्पेशल
अहमदनगर प्रतिनिधी सुनील नजन
जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील वकील संभाजी राजाराम ताके व त्यांच्या गाडीचा चालक संतोष सुंदर घुमे रा.बहिरवाडी यांचा वकिलांचा पुतण्या आरोपी शरद शिवाजी ताके यांनी शेतीच्या वादातून निर्घृणपणे खून केला आहे. संभाजी ताके हे अहमदनगर जिल्हा न्यायालयातील सुप्रसिद्ध वकिल होते .तसेच बार असोसिएशनचे पदाधिकारी होते.आरोपी शरद शिवाजी ताके आणि अँड संभाजी ताके यांच्या मध्ये जमिनीच्या वादातून नेवासे येथील तालुका न्यायालयात खटला सुरू आहे.
बुधवार दि.२आँक्टोबर २०१९ रोजी गांधी जयंती निमित्त कोर्टास सुट्टी असल्याने संभाजी ताके वकील हे आपल्या नागरदेवळे ता.नगर येथील घरून निघून जेऊर हैबती ता.नेवासा जिल्हा अहमदनगर येथील शेतीला फेरफटका मारायला आपल्या वाहनातून गेले होते.तेथे पुतण्या शरद शिवाजी ताके यांच्या मध्ये जोरदार भांडण झाले. भांडणातुन वकील साहेब व त्यांच्या गाडीचा चालक यांचा निर्घृणपणे खुन करण्यात आला. नंतर आरोपी स्वतः हुन नेवासे येथील पोलिस ठाण्यात हजर झाला व झालेल्या प्रकार सांगितला.नेवासे पोलिसांनी आरोपी ला अटक केली आहे.ही माहिती समजताच शेवगाव विभागाचे पोलिस उप अधिक्षक मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध वकिलाचा खून झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वकीलांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.








