Maharashtra

माळशेवगे येथून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या हातून पूजा करून प्रस्थान…

माळशेवगे येथून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या हातून पूजा करून प्रस्थान…

माळशेवगे येथून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या हातून पूजा करून प्रस्थान...

चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
विठ्ठल हे श्रमकरी कष्टकरी बहुजन समाजाचे दैवत.दरवर्षी पंढरपुराला शेकडो भाविक पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जातात. पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होऊन आपल्यातील सामाजिक समता व ममतेचे दर्शन घडते. यावर्षी युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांच्यामार्फत अडीच हजार वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घडले.
आज माळशेवगे येथून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीची सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पूजा करून सुरुवात करण्यात आली. माळशेवगे गावातील 55 वारकरी युवानेते मंगेश दादा चव्हाण यांच्यामार्फत माळशेवगे हुन निघणाऱ्या वारीत सहभागी होते.या वारीला जातांना सोबत गोळ्या-औषधांचे मेडिकल किट देण्यात आले.
सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी, ” पंढरीचा विठूराया हा समतेचे व ममतेचे प्रतीक आहे.आपण कष्टकरी समाजातील लोक विठ्ठलाच्या चरणी लीन होतो. या वारीसाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा.” असे मत याप्रसंगी मांडले. यावेळी त्यांच्यासोबत सौ जयश्री रणदिवे,सौ योजना चव्हाण ,सौ कावेरी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच दिगंबर मोरे, निंबा अंबर पाटील, दिलीप व्यंकट पाटील, रवींद्र भिवसन पाटील, बाळासाहेब गंगाधर पाटील, राम पाटील, भाईदास पाटील, मा.सरपंच ज्योतीराम पाटील, विलास सूर्यवंशी, निंबा नामदेव पाटील यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button