चाळीसगाव येथे भुजल अभियानातर्फे जल आराखड्यासंदर्भात ऑनलाइन मिटिंग संपन्न.
सोमनाथ माळी चाळीसगाव
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील गावामध्ये शिवनेरी फाऊंडेशन भुजल अभियान, सहज जलबोध अभियान अंतर्गत जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामामध्ये तात्रिकता असावी, शास्रशुध्द पध्दतीने कामे झाली पाहिजे यासाठी दर आठवड्यात ऑनलाईन पध्दतीने पाणी समिती सदस्य आणि अधिकारी वर्ग मिटींग मध्ये सहभागी होऊन चर्चा करून आढावा घेण्यात येतो.अशाच प्रकारे रविवारी ऑनलाईन मिटींग संपन्न झाली. यामध्ये भुजल अभियानाचे गुणवंत भाऊ सोनवणे, गटविकास अधिकारी वाळेकर साहेब, भुजल तज्ञ सुजित शिंपी,पोखराचे प्रकल्प अधिकारी संजय पवार व तालुक्यातील विस गावातील पाणी समिती प्रमुख सहभागी झाले होते.
गावात किती पाऊस पडतो, किती वाहून जातो, बाष्पीभवन किती पाण्याचे होते आणि गावाची पाण्याची गरज किती यावर सविस्तर पाणी प्रमुखांची चर्चा झाली.
गावाची पाण्याची गरज ही उपलब्ध जलसाठा पेक्षा जास्त आहे असे निष्कर्षण आले व आपल्याला जल सांधरणाचे उपचार गावात राबवले पाहिजेत अशा तांत्रिक चर्चा या मीटिंगमध्ये झाल्या.गावाचा पाण्याचा ताळेबंद यावर सुजित शिंपी, भूजल तज्ञ यांनी मार्गदर्शन केले.
शासन कशा प्रकारे मदत करू शकते याबद्दल तालुक्याचे गटविकास अधिकारी वाळेकर यानी मार्गदर्शन केले. पोकरा चे प्रकल्प अधिकारी संजय पवार यांनी पोखरा मध्ये जल संधरणाची कोणती कोणती कामे होवु शकतात याबद्दल सविस्तर माहिती दिली.
अशा प्रकारचे पाणी समिती प्रमुख,शेतकरी हे दर आठवड्याला ऑनलाईन पद्धतीने मीटिंगमध्ये सहभागी होतात हे आदर्श ठरत आहे.
गावा गावात पाण्याची तांत्रिक चळवळ मोठ्या प्रमाणात उभी करणार असल्याचे भुजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यानी स्पष्ट केले.







