Nanded

? Big Breaking… बेटमोगरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला ४ लाख ९२ हजार ५५२ रुपये सुरक्षित

? Big Breaking

बेटमोगरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला

४ लाख ९२ हजार ५५२ रुपये सुरक्षित

नांदेड प्रतिनिधी :- वैभव घाटे

तालुक्यातील बेटमोगरा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न दि.१६ मार्च रोजी मध्य रात्री घडली.

सविस्तर वृत्त असे की,बेटमोगरा हे गाव मोठी बाजारपेठ असल्याने येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या बँकेत शेतकऱ्यांसाठी पीक विमा व दुष्काळी मदतीसाठी परिसरातील पंधरा ते वीस गांवाच्या कारभार होत होता.परंतु ह्या बँकेत दि.१६ मार्च रोजी मध्य रात्री चोरट्यांनी बँक फोडून तेथील तिजोरी उचलून व गावातीलच अॅटो क्रं.एम.एच.२६ ए.सी.४७०६ हा अॅटो चोरुन तिजोरी घेऊन गावातील मन्याड नदी काठी जावून लॉक तोडण्याचा प्रयत्न केला पण तिजोरी वजनदार असल्याने फुटली नाही, शेवटी चोरट्यांनी तिजोरी व अॅटो सोडून पसार झाले.हा प्रकार सकाळी गावातील नागरिकांना समजताच त्यांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापक, मुखेड व देगलूर पोलिस ठाण्यात कळवली असता पोलिस उपअधीक्षक देगलूर रमेश सरवदे व मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर येऊन सदरिल घटनेची चौकशी व पंचनामा केला असता चोरट्यांना तिजोरी फुटली नसल्यामुळे तिजोरीतील ४ लाख ९२ हजार ५५२ रुपये सुरक्षित असल्याचे बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी सांगितले.
तसेच या घटनेचा पुढील तपास देगलूर पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे यांच्या नेतृत्वाखाली मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांनी करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button