Galandwadi

छत्रपती संभाजीमहाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीमहाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी दत्ता पारेकर

छत्रपती संभाजीमहाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान गलांडवाडी नं. १ आयोजित छञपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे ४.३० वाजे पासून गलांडवाडी भजनी मंडळींनी काकड आरती सुरू केली. त्याचवेळेस प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सोनाई परिवाराचे मसाले दुध व शिरा प्रसाद म्हणून बनवायला सुरुवात केली.

छत्रपती संभाजीमहाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

६.०० वाजेपासून दुध, तुप, दही, गोमुञ, व पुरंदर किल्ल्यावरुन आणलेले पाणी यांनी संभाजीराजांना अभ्यंग स्नान घालण्यात आले. याप्रसंगी गावातील मोठ्या संख्येने महिला व शंभूप्रेमी उपस्थित होते. त्याचबरोबर पंढरपूर येथून राधा गिरीधरदास महाराज, वालचंदनगर येथील काही शंभूप्रेमी, इंदापूर येथील शिवभक्त परिवार, कालठण येथील शिवभक्त आवर्जून न सांगता उपस्थित होते. गलांडवाडी लेझीम पथकाने लेझीम खेळून शोभा वाढवली. सर्वांना महाप्रसाद देऊन सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Back to top button