केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी कायदा करावा खा. उन्मेश पाटील यांना निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चाची मागणी..
प्रतिनिधी/नितीन माळे
चाळीसगाव – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पाच सदस्यीय घटनापीठाकडे मराठा आरक्षण हा विषय देऊन नोकरी व शैक्षणिक विषय व इतर आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड नाराजी आहे .सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यास अपयशी ठरले असून मराठा समाजाच्या मुलांना नोकरीमध्ये जाण्याची व उच्च शिक्षण घेण्याची संधी राज्य सरकार मुळे गेलेली आहे. मराठा तरुणांचे जीवन अंधकारमय झाले आहे.म्हणून केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी कायदा करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात यावा यासाठी खा. उन्मेश पाटील यांना दि ३ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
केंद्र सरकारने ई डब्ल्यू एस 10 % आरक्षण सुवर्ण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना दिले.त्या आरक्षणाला कोर्टात स्थगिती मिळाली नाही. म्हणून केंद्र सरकारने ई डब्ल्यू एस आरक्षण ज्या निकषावर दिले त्याच निकषांनुसार मराठा समाजाला कायदा करून आरक्षण द्यावे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ५० % च्या वर आरक्षण देता येत नाही असे सांगितले आहे. मात्र तामिलनाडु सरकारने ५९ % आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाला ही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता घटनापिठाकडे पाठवले आहे. कारण दक्षिणेकडील राज्यांनी केंद्राच्या परिशिष्ट ९ मध्ये आरक्षण विषय टाकुन कायद्याचा आधार घेतला आहे. म्हणून केंद्र सरकारने त्याच धर्तीवर ई एस बी सी जे आरक्षण मराठा समाजाला राज्य सरकारने दिले आहे. ते केंद्राच्या परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट करावे. तसेच खासदार नचिपन यांच्या अध्यक्षते खालील समितीचा अहवाल स्वीकारावा . किंवा केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी कायदा करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात यावा यासाठी खा. उन्मेश पाटील यांना लक्ष्मी नगर स्थित त्यांच्या संपर्क कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि ३ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .निवेदनावर गणेश पवार,प्रमोद पाटील,अरुण पाटील,खुशाल पाटील,दिनकर कडलग ,प्रमोद वाघ,दिपक देशमुख,सुनिल निंबाळकर, बंडु पगार,छोटु अहिरे ,भाऊसाहेब सोमवंशी यांच्या सह समाज बांधवांच्या सह्या आहेत .
दरम्यान खासदार उन्मेशदादा पाटील यांनी देखील मराठा आरक्षणासाठी आमदार असताना पासून पाठपुरावा करून प्रयत्न केले होते . केंद्र सरकार कडे खासदार म्हणून आरक्षणासाठी प्रयत्नांची पराकष्टा करून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटीबध्द असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला यावेळी सांगितले






