धुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक – भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार मंगेश चव्हाण यांचा झंझावाती प्रचार दौरा.
मनोज भोसले
धुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रतनपूरा गटाचे अधिकृत उमेदवार श्री.यशवंत दामू खैरनार व रतनपूरा गणाच्या उमेदवार सुशिलाबाई भिल्ल तसेच मोघन गणाच्या उमेदवार हिरकनबाई भावसिंग मोरे यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचा झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला.
प्रचार दौऱ्यात त्यांनी विसरणे, तिखी, ढाढरा – ढाढरी या गावात प्रत्येक घरात भेट देऊन संवाद साधला.
तीन तिघाडी आघाडीच्या मागे न लागता स्थिर आणि मजबूत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, माजी उपसभापती संजू तात्या पाटील, माजी जि प सदस्य किशोर माधवराव पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस अमोल चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.






