Nashik

नाशिक शहर पोलीस आयुक्त दिपक पांडे भेटणार थेट पोलीस चौकीत ..

नाशिक शहर पोलीस आयुक्त दिपक पांडे भेटणार थेट पोलीस चौकीत ..

प्रतिनिधी : शांताराम दुनबळे नाशिक.


नाशिक : नाशिक शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनला दररोज एक तास एका चौकीवर
पोलीस ठाण्यातील साप्ताहिक जनता दरबाराच्या धर्तीवर आता दररोज संध्याकाळी पोलीस आयुक्त दीपक पांडे हे स्वतः प्रत्येक पोलिस ठाण्यातील पोलिस चौकीला भेट देत तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी व परिसरातील नागरिकांची थेट संवाद साधणार आहे संध्याकाळच्या एक तास एक पोलिस चौकीला देणार आहे पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील हद्दीतील चौक्या मिळून सुमारे ७० पोलीस चौकी आहे यामधील काही संवेदनशील भागात आहे बहुतांश चौक्या आधुनिक व स्मार्ट पद्धतीने विकसित करण्यात आले आहे मात्र तेथील कामकाज खरंच स्मार्ट झाले आहे का ? याबाबतीत ची चाचपणी पोलीस कमिशनर करणार आहेत,
पोलीस चौकीत कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचारी ठराविक भागातील गुन्हेगार गुन्हेगारी घटना तक्रार अवैध धंदे याकडे लक्ष ठेवावे लागते त्यामुळे तेथील पोलीस कर्मचाऱ्यांची संवाद साधत पोलीस कमिशनर परिसरातील गुन्हेगारांना फोडून काढण्यासाठी कानमंत्र देणार यावेळी प्रत्येक पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणीही जाणून घेणार आहेत, पोलीस चौक्याप्रमाणेच कारभार सुद्धा स्मार्ट होणे गरजेचे आहे , त्यामुळे येथील कामकाजात सुधारणा व्हाव्यात या उद्देशाने पोलीस कमिशनर यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे पोलीस ठाण्यातील दरबाराबाबत २ दिवसांपूर्वीच पोलिस उपायुक्तांना माहिती दिली जाते मात्र पोलिस चौकीच्या भेटीची माहिती संबंधित परी मंडळाच्या उपायुक्तांना केवळ तासाभरापूर्वी दिली जाणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button